AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगा गोरा जन्मला, वडीलांना मित्र चिडवू लागले, पतीने सासुरवाडीत जाऊन केले असे काही..की..

मुलगा गोरा जन्माला आल्याने संशयाच्या भुंगा डोक्यात शिरल्याने एकाने आपल्या सोन्यासारख्या संसाराची राखरांगोळी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुलगा गोरा जन्मला, वडीलांना मित्र चिडवू लागले, पतीने सासुरवाडीत जाऊन केले असे काही..की..
| Updated on: Nov 21, 2025 | 8:29 PM
Share

अरे तु तर काळा आहेस तुला गोरा मुलगा कसा झाला असे मित्र मंडळी चिडवत होती. आपल्या मित्र मंडळीत हास्याचा विषय ठरलेल्या एका पतीचे डोके त्यामुळे भडकले. मित्रच काय तर शेजारीही टोमणे मारु लागण्याने चिडलेला हा बाप अखेर आपल्या सासुरवाडीला गेला आणि तेथे त्याने असा भयानक प्रकार केला की सारे गाव हादरले.

आपला रंग काळा ठीक्कर आणि मुलगा गोरा जन्माला आल्याने त्याला मित्रमंडळी चिडवू लागली. त्यामुळे त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली. त्यातच शेजारीपाजरी देखील टोमणे मारु लागल्याने या बापाने थेट सासुरवाडी गाठली. त्यानंतर संशयांच्या भुंग्यामुळे त्याचा हातून एवढी मोठी चूक झाली की त्याला आता आयुष्यभर पश्चाताप होणार आहे.

ही धक्कादायक घटना बिहार येथील कटिहार जिल्ह्यातील अबादपुर ठाणे हद्दीतील नारायणपूर गावातील आहे. या घटनेनंतर या भागात खळबळ माजली. घटना स्थळी पोलिस दाखल झाली. त्यांना पती विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार

आझमनगर पोलीस ठाणे हद्दीतील जलकी गावाचे रहिवासी सुकुमार दास यांच्या पत्नीला तीन महिन्यांपूर्वी मुलगा झाला. त्याच्या आधी त्याला आणखी एक मुलगा आहे. मात्र तो त्याच्या रंगाचा काळा सावळा होता. परंतू नुकताच झालेला दुसरा मुलगा गोरापान होता. गोऱ्यापान मुलाला पाहून सुकुमार याला त्याच्या पत्नीच्या चरित्रावर संशय येऊ लागला. त्यातच सुकुमार यांच्या मित्रांनी आणि शेजाऱ्यांनी आगीत तेल टाकण्याचे काम केले. तूर काळा आहेस आणि तुझा मुलगा गोरा कसा काय झाला ? असे त्याला टोमणे मारु लागले.

त्यानंतर त्याला वाटू लागले की हा आपला मुलगा नाही. सुकुमार दास याने त्याची पत्नी मौसमी दास हिच्याशी भांडायला सुरुवात केली.आणि तिला मुलाचा खरा बाप कोण सांग असे तो विचारु लागला. मौसमी त्याला समजावून सांगत होती की हा त्याचाच मुलगा आहे. परंतू सुकुमार याला काही त्यावर विश्वास वाटत नव्हता. पती-पत्नीत त्यावरुन खटके उडू लागले. त्यामुळे मौसमी तिच्या वडीलांना बोलावले आणि ती माहेरी गेली.

रक्ताचा सडा पडला होता

सुमारे तीन महिने यावरुन दोघांत भांडणे होत होती. सुकुमार याच्या सासऱ्याने देखील त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. रात्री सर्वजण जेवून झोपण्यासाठी गेले. रात्री सुकुमार याने त्याची पत्नी मौसमी हीची गळा चिरुन हत्या केली आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवरही अनेक वार केले. दुसऱ्या दिवशी कुटुंबिय जागे झाले तर मुलीची खोली उघडी होती. आतून मुलाचा रडण्याचा आवाज येत होता. कुटुंबातील लोकांनी आत पाहिले तर त्यांना धक्का बसला. मुलीचे प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तर जावई फरार झाला होता. या प्रकरणात पोलिस फरार सुकुमारचा शोध घेत आहेत.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?