AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे पूजा शर्मा ? हजारो बेवारस मृतदेहांचा अंतिमसंस्कार केल्याने चर्चेत आली, आता पोलीसांनी का अटक केली ?

बेवारस मृतदेहांचा अंतिमसंस्कार करुन चर्चेत आलेली एका तरुणीच्या आयु्ष्याला पुन्हा कलाटणी मिळाली आहे. अनेक गरजू आणि गरीबांची मदत करणाऱ्या या तरुणीला आता पोलिस कारवाईला सामोरे जावे लागले आहे.काय झाले नेमके ?

कोण आहे पूजा शर्मा ? हजारो बेवारस मृतदेहांचा अंतिमसंस्कार केल्याने चर्चेत आली, आता पोलीसांनी का अटक केली ?
Who is Pooja Sharma?
| Updated on: Nov 17, 2025 | 11:28 PM
Share

एक तरुणी जिला काही वर्षांपूर्वी लोक असहाय लोकांना मदत करणारी देवदूत समजत होते. तिच्यावर आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ज्यामुले तिचे जगच बदलले आहे. बेवारस मृतांना खांदा देणारी तरुणी जी एकेकाळी  अनोळखी व्यक्तीच्या अखेरच्या प्रवासात सामील होत असे. आता याच तरुणीला अशा आरोपाखाली अटक झाली आहे की  लोक तिला आता वेगळ्याच नजरेने पहात आहेत. विशेष म्हणजे बीबीसीने या तरुणीचा साल 2024 च्या 100 कतृत्ववान महिलात समावेश केला होता.

कोण आहे पूजा शर्मा

पूजा शर्मा दिल्लीतील समाजसेविका आहेत. २०२२ मध्ये तिच्या आईचा मृत्यू आणि मोठ्या भावाची हत्या झाल्यानंतर तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. तिच्या भावाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी तिने स्वत:च सांभाळली. या अनुभवामुळे तिने विचार केला की ज्यांच्याकडे अंतिम संस्कारासाठी कोणी पुढे येत नाही अशा बेवारस लोकांसाठी मदतीसाठी मदत का करु नये ? त्यानंतर अशा बेवारस लोकांचा अंत्यसंस्काराचा विडाच तिने उचलला. पूजाने आता पर्यंत 6,000 हून अधिक अंत्यसंस्कारचा खर्च उचलला आहे.मृतांच्या धर्म आणि रितीरिवाजानुसार ती अंतिम संस्कार करते. पूजा अनेकांचा सहारा बनली

पूजाने या कामासाठी स्वत:ची नोकरी सोडली आणि पूर्णवेळी हे काम ती करु लागली. तिने Bright the Soul Foundation नावाची एनजीओ स्थापन केली. आणि गरजू तसेच गरीब लोकांना मदत करु लागली. पूजा हॉस्पिटल आणि पोलीस मॉर्चुरी येथून बेवारस मृतदेहांची माहिती मिळवते आणि त्यांच्यासाठी वाहन आणि अंतिम संस्काराची व्यवस्था करते. हे काम केवळ मृतदेहांचा सन्मान करत नाही तर समाजातील माणूसकी आणि सेवेचे उदाहरण ठरत आहे. तिच्या सातत्यपूर्ण मेहनत आणि सेवेमुळे अनेक लोक आणि संस्था तिच्या मदतीला आल्या, त्यामुळे तिचे मिशन मोठे झाले होते.

परंतू ८ नोव्हेंबरच्या रात्री नंद नगरीत सन्नी मेहरा याच्या झालेल्या हत्येने तिच्या जीवनाला वेगळेच वळण लागले आहे. ज्याची तिने कल्पनाही केलेली नसेल.

पूजावर काय आरोप ?

पूजा आणि तिचा भाऊ रवि शर्मा यांना संशय होता की सन्नी याचा त्यांचा भाऊ छटंकी याच्या हत्येत सहभाग होता. या संशयाने त्यांना हिंसक वळणावर उभे केले. आता रवि शर्मा याच्यावर आरोप आहे की त्याने सन्नी याला पार्कमध्ये नेऊन केबलने बांधले. बांबूंनी मारहाण केली आणि त्यावेळी पूजाने तेथे येऊन तिच्या भावाला आणखी भडकल्याचा आरोप आहे.काही वेळा नंतर रवि शर्मा याने पिस्तुल आणले आणि सन्नी याची गोळ्या घालून हत्या केली.

सीसीटीव्ही फूटेजमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पूजा आणि अन्य एक आरोपी स्पष्ट दिसत आहेत. आता दोघांची रवानगी जेलमध्ये झाली आहे तर मुख्य आरोपी पूजाचा भाऊ रवि शर्मा फरार आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.