दिल्ली बॉम्बस्फोटाशी नाव जोडल्यानंतर अल-फलाह यूनिव्हर्सिटीचा खुलासा, म्हणाले ‘आमच्या येथे केमिकल…’
10 नोव्हेंबरच्या दिल्लीतील ब्लास्ट संपूर्ण देशाला हादरवले आहे. या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठाशी जोडले जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता विद्यापीठाने खुलासा केला आहे.

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात अल-फलाह युनिव्हर्सिटी चर्चेत आली आहे. हरियाणाच्या फरीदाबाद येथील अतिरेकी मॉड्युलचा भंडाफोड करत पोलिसांनी अल-फलाह युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर मुझम्मिल याला अटक केली होती. त्यानंतर त्याच्या रुममधून 360 किलो स्फोटके आणि शस्रास्रे जप्त केली होती. एवढेच नव्हे तर दिल्ली ब्लास्टमध्ये ज्या उमर उन नबीवर आत्मघाती हल्ल्याचा संशय आहे, तो देखील अल-फलाह युनिव्हर्सिटीशी जोडलेला आहे. अशात फरीदाबाद पोलिसांनी युनिव्हर्सिटी कँपसमध्ये रेड टाकून अन्य संशयितांची माहिती काढत आहे.
या दरम्यान अल-फलाह युनिव्हर्सिटीच्या वतीने प्रेस रिलीज जारी करुन स्पष्टीकरण करण्यात आले आहे. अल-फलाह युनिव्हर्सिटीच्या मॅनेजमेंटने संशयित अतिरेकी डॉक्टरांचा संस्थेशी कोणताही खाजगी संबंध नसल्याचे म्हटले आहे. ते केवळ त्यांच्या शैक्षणिक प्रोफेशन कामाशी संबंध ठेवून होते. युनिव्हर्सिटीने हे स्पष्ट केले आहे की कँपसमध्ये कोणत्याही रासायनिक साम्रगीचा वापर केला जात नाही. तसेच येथे कोणतेही केमिकल ठेवले जात नाही असेही युनिव्हर्सिटीने स्पष्ट केले आहे.
युनिव्हर्सिटीच्या प्रोटोकॉलनुसार होते काम
अल-फलाह युनिव्हर्सिटीने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये हे स्पष्ट केले आहे की त्यांच्या लॅबचा वापर केवळ MBBS च्या विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग आणि शिक्षणासाठी होत असतो. आणि सर्व कामकाज प्रोटोकॉलनुसार होत असते.
आम्ही या दुर्दैवी घटनाक्रमामुळे खूप व्यतिथ आहोत आणि याचा निषेध करत आहोत. आमची या घटनेतील मृतांच्या नातलगांशी सहवेदना व्यक्त करत आहोत. आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत. आम्ही हे स्पष्ट करत आहोत की युनिव्हर्सिटीचा या दोन्ही डॉक्टरांशी कोणताही व्यक्तिगत संबंध नाही असे अल-फलाह युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉ. भूपिंदर कौर यांनी म्हटले आहे.
तपासात सहकार्याची भूमिका
आम्ही हे स्पष्ट करत आहोत की आम्ही एक जबाबदार संस्थेच्या रुपात हे स्पष्ट करु इच्छीत आहोत की आम्ही राष्ट्राच्या बाजूने एकजूट उभे असून आपल्या देशाची एकता, शांतता आणि सुरक्षेसाठी आपली अतूट प्रतिबद्धतेची पुष्टी करत आहोत. या शिवाय आमचे विद्यापीठ तपास यंत्रणेला तपासासाठी सर्व सहकार्य करण्यात तयार आहोत. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा संबंधित प्रकरणात तार्किक, निष्पक्ष आणि निर्णायक निर्णय घेऊ घेता यावेत यासाठी तपासात सर्व सहकार्य करणार असल्याचेही विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर भूपिंदर कौर आनंद यांनी स्पष्ट केले आहे.
साल 2015 पासून UGC ची मान्यता
अल-फलाह यूनिव्हर्सिटीला विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१५ साली मान्यता दिली होती. या अनेक कोर्सेस आहेत. तसेच एक रुग्णालय देखील आहे. जे अल -फलाह विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजचा एक भाग आहे. येथे अनेक देशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अल-फलाह युनिव्हर्सिटीत डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि डॉक्टरेटच्या डीग्रीसाठी शिक्षण दिले जाते.
