AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel, America, Iran War : अखेर इराणची माघार, केली सर्वात मोठी घोषणा, जगाला मोठा दिलासा

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इराणने मोठी घोषणा केली असून, त्यामुळे जगाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Israel, America, Iran War : अखेर इराणची माघार, केली सर्वात मोठी घोषणा, जगाला मोठा दिलासा
Iran Israel WarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 07, 2026 | 8:23 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तर दुसरीकडे इराणने देखील अमेरिका आणि इस्त्रायलला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान इराणने केवळ अमेरिका आणि इस्त्रालयवरच हल्ला केला नव्हता तर इराणकडून अनेक आखाती देशांवर देखील हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यांमध्ये आखाती देशांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर इराणकडून आखाती देशांची माफी मागण्यात आली आहे, तसेच त्यांनी जर आमच्यावर हल्ला केला नाही तर आता शेजारील देशांवर आम्ही हल्ला करणार नसल्याचं देखील इराणने म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केला होता. या सामुद्रधुनीमधून केवळ चीनच्या जहाजांनाच जाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ही बंदी इराणने काही प्रमाणात हटवली, त्यानंतर इराणकडून अशी घोषणा करण्यात आली की, अमेरिका, युरोपियन देश तसेच त्यांचे सहकारी वगळता सर्व देशांना या मार्गाने जाऊ दिलं जाईल. दरम्यान त्यानंतर आता अखेर इराणने माघार घेतली आहे . इराणने आता हा मार्ग सर्वच देशांसाठी खुला केला आहे. त्यामुळे जगावरील एक मोठं इंधन संकट टळण्याची शक्यता आहे.

25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक

जगाला जेवढ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आवश्यकता आहे, त्यातील सु्मारे 25 टक्के तेलाची वाहतूक याच मार्गेने होते. त्यामुळे इराने हा मार्ग बंद केल्यामुळे जगभरात मोठं इंधन संकट निर्माण झालं होतं. भारताला देखील काही प्रमाणात याची झळ बसली, मात्र आता गुडन्यूज समोर आली असून, इराने हा मार्ग सर्व देशांसाठी सुरू केला आहे. हा मार्ग आता सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा इंधन पुरवठा सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे.

Follow Us
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य