मित्र म्हणाला तुझी पत्नी…, पतीला संताप अनावर झाला मग जे घडलं ते भयंकर

मित्र नेहमी पतनीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करायचा. यामुळे पती सतत तणावात रहायचा. अखेर पतीचा संयम सुटला अन् जे घडलं ते भयंकर.

मित्र म्हणाला तुझी पत्नी..., पतीला संताप अनावर झाला मग जे घडलं ते भयंकर
कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 24, 2023 | 12:33 PM

गिरीडाह : आजकाल छोट्या कारणातून जीव घेण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावेळी नात्यांचाही विसर पडलेला दिसतो. अशीच एक घटना झारखंडमधील गिरीडोहमध्ये घडली आहे. पत्नीबद्दल मित्राने बोलणे ऐकताच पतीला संताप अनावर झाला अन् त्याने जिवलग मित्राचाच काटा काढला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे. राजकुमार यादव असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर महेश कुमार असे आरोपीचे नाव आहे. दोघेही ट्रक चालक होते आणि एकमेकांचे जिवलग मित्रही होते.

राजकुमार महेशच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करायचा

महेश कुमारचे 13 वर्षापूर्वी लग्न झाले होते. माझे तुझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत. ती माझी प्रेमिका होती आणि लग्नाआधी ती माझ्यासोबत रहायची, असे मयत राजकुमार आरोपी महेशला म्हणाला. तसेच राजकुमार त्याच्या इतर मित्रांनाही महेशच्या पत्नीसोबत अनेकदा हनीमून साजरा केला आहे. महेशच्या पत्नीचा तो पहिला नवरा आहे, असे सांगायचा.

पेमेंट देण्याच्या बहाण्याने बोलावले अन्…

राजकुमारच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे महेश तणावात रहायचा. यामुळे त्याने राजकुमारचा काटा काढण्याचा कट रचला. यासाठी काही महिन्यांपूर्वी त्याने हत्यार खरेदी केले. यानंतर शांतपणे त्याने राजकुमारच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार बगोदर पोलीस ठाण्याअंतर्गत भारत पेट्रोल पंपाजवळ एका हॉटेलमध्ये राजकुमार जेवण घेण्यासाठी गेला होता. यावेळी महेशने त्याला एक पेमेंट घेण्याच्या बहाण्याने पेट्रोल पंपाजवळ बोलावले आणि गोळ्या झाडून हत्या केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us