सुरतमधील धक्कादायक घटना, तुमच्या मुलांशी असं कधीच खेळू नका आणि कुणाला खेळूही देऊ नका, कारण

| Updated on: May 15, 2023 | 9:29 PM

पण या घटनेवरुन एवढंच सांगता येईल, तुमच्या मुलांसोबत फोटोत दिसतंय त्याप्रमाणे कधीही खेळू नका, आणि दुसऱ्यांना खेळूही देऊ नका.

सुरतमधील धक्कादायक घटना, तुमच्या मुलांशी असं कधीच खेळू नका आणि कुणाला खेळूही देऊ नका, कारण
Follow us on

सुरत : लहान मुलं ही सर्वांचीच लाडकी असतात, मुलं ही देवा घरची फुलं असल्याने सर्वांनाच आवडतात. लहान मुलांनी सतत हसावं असं सर्वांना वाटतं, ती सतत हसत राहावीत म्हणून पालक किंवा नातेवाईक त्यांच्याशी तेवढंच लहान बनून खेळतात, त्यांना हसवतात, पण या दरम्यान त्यांच्याशी खेळताना हा खेळ राक्षसी ठरु नये याची जरुर काळजी घ्या. लहान मुलांना सांभाळताना तुम्ही ज्या प्रकारे डोळ्यात तेल घालून सांभाळतात, त्याच प्रमाणे त्यांच्याशी खेळताना काहीही वाईट घटना घडू नये याची जरुर काळजी घ्या, हे सर्वकाही सांगण्यामागे तशा घटना देखील घडतात, गुजरातमधील सुरतमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आणि सर्वांच्या अंगावर काटे आले आहेत, त्या पित्याची अवस्था अतिशय वाईट अशी झाली आहे, पण या घटनेवरुन एवढंच सांगता येईल, तुमच्या मुलांसोबत फोटोत दिसतंय त्याप्रमाणे कधीही खेळू नका, आणि दुसऱ्यांना खेळूही देऊ नका.

पंख्याचा पाता आदळला

सुरतमध्ये मसरुद्दीन शाह आपल्या तीन महिन्यांच्या मुलीसोबत खेळत होते. याच दरम्यान पंख्याचा पाता आदळल्याने बालक गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तीन महिन्यांची मुलगी होती

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सुरतच्या लिंबायतमधील खानपुरा भागात मसरुद्दीन शाहचे कुटुंब राहते. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मसरुद्दीनला तीन मुली आणि एक मुलगा आहे. शनिवारी मसरुद्दीन त्याची तीन महिन्यांची मुलगी झोया हिच्यासोबत खेळत होते.

झोयाचा उपचारादरम्यान मृत्यू

झोयाचं डोकं पंख्याच्या पात्याला लागले. त्यामुळे झोया गंभीर जखमी झाली. तातडीने मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, यात चिमुरडी झोयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर लिंबायत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या संदर्भात पुढील तपास सुरू आहे. जे घडलं ते धक्कादायक होतं. तीन महिन्यांची चिमुकली पंख्यात सापडली. यात तिचा मृत्यू झाला. लहान मुलांना खेळवत असताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.