एकाच वेळी दोघींवर जीव जडला, मग पार्कमध्ये दोघींमध्ये चांगलाच सामना रंगला !

एक जोडपे शिवाजी पार्कमध्ये बसले होते. इतक्यात तरुणाची दुसरी गर्लफ्रेंड तिथे पोहचली. दोन्ही गर्लफ्रेंड समोरासमोर आल्या अन् जे घडलं ते थांबवणं तरुणालाही कठिण झालं.

एकाच वेळी दोघींवर जीव जडला, मग पार्कमध्ये दोघींमध्ये चांगलाच सामना रंगला !
पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवले
Image Credit source: social
| Updated on: Feb 28, 2023 | 5:57 PM

यवतमाळ / विवेक गावंडे : एकाच वेळी दोन मुलींवर प्रेम करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. दोन तरुणींचे एकाच मुलावर प्रेम जडले. तो तरुणही दोघींना डेट करत होता. पण अचानक दोघी आमनेसामने आल्या अन् पार्कमध्येच दोघींमध्ये सामना रंगला. दोन्ही तरुणी पार्कमध्ये एकमेकींना भिडल्या. तरुणींची फ्री स्टाईल हाणामारी मोबाईलमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वणी नगरपरिषदेच्या हद्दीत शिवाजी पार्कमध्ये ही घटना घडली आहे. यानंतर बॉयफ्रेंड मात्र तेथून पळून गेला.

पार्कमध्ये दोन्ही गर्लफ्रेंड आमनेसामने आल्या अन्…

यवतमाळच्या वणीमध्ये नावाजलेला पॉइंड म्हणजे शिवाजी पार्क आहे. यात दिवसरात्र कित्येक जोडपे येतात. असेच एक जोडपे शिवाजी पार्कमध्ये बसले होते. इतक्यात तरुणाची दुसरी गर्लफ्रेंड तिथे पोहचली. दोन्ही गर्लफ्रेंड समोरासमोर आल्या अन् जे घडलं ते थांबवणं तरुणालाही कठिण झालं. दोघीही ‘तो माझा आहे, तो माझा आहे’ म्हणत एकमेकींना भिडल्या.

दोन्ही गर्लफ्रेंड भिडलेल्या पाहून तरुणाचा काढता पाय

या मारहाण करणाऱ्या दोन्ही तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून, दोघीही वणी येथील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. एका वेळी दोघींसोबत प्रेमाच्या आणाभाका घेणं तरुणाच्या चांगलंच अंगलट आलं. दोन गर्लफ्रेंडमधील फ्री स्टाईल हाणामारी पाहून तरुणाने तेथून हळूच काढता पाय घेतला.