‘तिचा’ काय दोष? ते जिवंत अर्भक रात्रभर थंडीत कुडकुडलं, नंतर कुत्र्यांनी जे केलं ते भयंकर होतं!

अर्भक फेकून दिल्याची माहिती मंगळवारी समोर आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, पंचनामा करत असतांना पोलिसही हळहळ व्यक्त करत होते.

तिचा काय दोष? ते जिवंत अर्भक रात्रभर थंडीत कुडकुडलं, नंतर कुत्र्यांनी जे केलं ते भयंकर होतं!
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 30, 2022 | 9:32 AM

चंदन पूजाधिकारी, नाशिक : नाशिकच्या अंबड हद्दीतील चुंचाळे शिवारात स्री जातीचे अर्भक फेकून दिल्याची बाब समोर आली होती. यामध्ये संतापजनकआणि तितकीच धक्कादायक घटना पोलीसांच्या तपासात समोर आली आहे. जन्मदात्या आई-वडिलांनीच तिला अवघ्या काही तासात फेकून दिल्याची बाब समोर आली आहे. अवघ्या काही तासांची ती होती, मुलगी जन्माला आली म्हणून काही तासातच जन्मदात्यांनी तिला पिशीवीत कोंबलं. घरातून दोघेही बाहेर पडले, आणि चालता-चालता रस्त्याच्या कडेल कचऱ्यासारखे फेकून दिले. यामध्ये कडाक्याच्या थंडीत अवघ्या काही तासांचे बाळ रडत राहिले, मात्र, क्रूर आई-बापाला तीची दया आली नाही. भर थंडीत आपल्यात बाळाला त्यांनी फेकून दिले. कुत्र्यांनी नंतर संधी साधली. रडत असलेल्या बाळाचे हाताचे आणि पायाचे लचके तोडले. यामध्ये अतिरक्तस्राव झाल्याने बाळाचा मृत्यू झाला होता.

अर्भक फेकून दिल्याची माहिती मंगळवारी समोर आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, पंचनामा करत असतांना पोलिसही हळहळ व्यक्त करत होते.

जन्मदात्यांनाच ती नकोशी झाल्याची बाब सीसीटीव्हीमुळे उजेडात आल्याने क्रूर आई-वडिलांवर संताप व्यक्त केला जात असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी होऊ लागली आहे.

सोमवारी मध्यरात्रीच्या दरम्यान ‘ती’ चा जन्म झाला होता, अवघ्या काही तासांची ती होती. आई-वडिलांनी मुलगी झाली म्हणून पिशवीत कोंबून रस्त्याच्या कडेला कचऱ्यासारखे फेकून दिले होते.

कडाक्याच्या थंडीत बाळ रडत होते, परिसरात असलेल्या कुत्र्यांनी त्याच्या हाताला आणि पायाला चावा घेतल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यामुळे बाळाचा मृत्यू झाला होता.

ही संतापजनक घटना घडल्यानंतर पोलीसांच्या तपासात आई-वडील दोघेही बाळाला फेकण्यासाठी जात असतांनाचा सीसीटीव्ही समोर आल्याने कारवाईची मागणी होत असून बाळाच्या अवस्था ऐकून नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.