दुबईच्या बोटीमध्ये रेवस बंदरात अग्नितांडव! तटरक्षक दलाचं 2 तास थरारक रेस्क्यू, चेतक हेलिकॉप्टरद्वारे लिफ्ट करत 5 जणांना जीवदान

Indian Coast Guard : सोलर पॅनरच्या बॅटरीला आग लागल्यामुळे बोटीतील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला होता. वेळीच धोका ओळखून तटरक्षक दलाला याबाबतची माहिती देण्यात आली.

दुबईच्या बोटीमध्ये रेवस बंदरात अग्नितांडव! तटरक्षक दलाचं 2 तास थरारक रेस्क्यू, चेतक हेलिकॉप्टरद्वारे लिफ्ट करत 5 जणांना जीवदान
भारतीय तटरक्षक दल
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 13, 2022 | 7:04 AM

मुंबई : तटरक्षक दलाने (Indian Coast guard) केलेल्या कामगिरीमुळे वादळाच्या (Heavy Winds) तडाख्यात अडकलेल्या बोटीतून पाच जणांनी सुखरुप सुटका करण्यात आली. रेवस बंदरात थरारक रेस्क्यू ऑपरेशनमुळे (Alibaug Mandwa Boat Rescue Operation) फिलीफाईन्सच्या पाच कर्मचाऱ्यांना जीव थोडक्यात वाचला आङे. रेवस बंदरात एक बोट खडकावर आदळली आणि त्यानंतर या बोटीला आग लागली होती. बोटीतील आगीची माहिती तटरक्षक दलाला देण्यात आली. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि सीआयएसएफच्या पथकाने बचावकार्य करण्यासाठी धाव घेतली. अखेर आग लागलेल्या या बोटीमधील पाच कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लिफ्ट करण्यात आलं. त्यामुळे या बोटीवरील सर्वांचा जीव थोडक्यात वाचला असून ही बोट मूळची दुबईतील असल्याची माहिती समोर आली आहे. दुबईहून कोचीन, मालदिवमार्गे मुंबईत ही बोट आली होती. सोलरवर चालणाऱ्या या बोटीची टेस्टिंग केली जात असताना त्या दरम्यान, हा अपघात घडला.

नेमकं काय घडलं?

28 जून रोजी दुबईतील सौर उर्जेवर चालणारी बोटी रेवस बंदर इथं दाखल झाली होती. पण या बोटीत बिघाड झाल्यामुळे दुरुस्तीचं काम सुरु होतं. 12 जुलै रोजी मध्यरात्री या बोटीतील बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि पुन्हा या बोटीतील कर्मचारी पुढच्या प्रवासा लागले होते. पण वातावरणाने दगा दिला. परिणाम बोट भरकत गेली. अखेर संभाव्य धोका लक्षात घेत बोटीच्या कॅप्टनने ही बोट बंदरामधीलच खडकाच्या बाजूला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण वाऱ्याचा आणि लाटांचा तडाखा बोटीला सहन झाला नाही आणि बोट थेट खडाकवर आदळली. यात बोटीला भगदाडही पडलं. शिवाय आगदेखील लागली.

दोन तासांचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन

सोलर पॅनरच्या बॅटरीला आग लागल्यामुळे बोटीतील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला होता. वेळीच धोका ओळखून तटरक्षक दलाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यात करुणा पांडे, बाथी सार, कारमेन क्लारे,लातुंबो सल्वनी, जयरालड फजनोय नाला, मार्कोनी फाब्रो फर्नांडिस यांना वाचवण्यात आलंय. जवळपास दीड ते दोन तास रेस्क्यू ऑपरेशनचा थरार सुरु होता. चेतक हेलिकॉप्टरच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं.