Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात १९९५ च्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणी अटक वॉरंट जारी झाले आहे. नाशिक सत्र न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. या प्रकरणामुळे त्यांची आमदारकी आणि मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. विरोधकांनी तात्काळ राजीनामा आणि बडतर्फीची मागणी केली आहे. कोकाटे रुग्णालयात दाखल असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात १९९५ च्या सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यामुळे कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असून, अटक झाल्यास त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद संपुष्टात येण्याची कायदेशीर तरतूद आहे. कायद्यानुसार, दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झालेल्या आमदाराला सदस्यत्व गमवावे लागते. सध्या कोकाटे हे लीलावती रुग्णालयात दाखल असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला असला तरी, न्यायालयाने कायद्याच्या कठोरतेवर भर दिला आहे. हे प्रकरण १९९५ सालचे असून, त्यावेळी माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये शासकीय कोट्यातून सदनिका मिळवली होती. या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातून आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी आरक्षित होत्या. परंतु, कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती सादर करून तसेच कमी उत्पन्न दाखवून या सदनिका लाटल्याचा आरोप आहे.
तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, १९९५ मध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणावर सुनावणी होऊन, फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे बंधूंना दोन वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली होती. नाशिक सत्र न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली आहे. दरम्यान विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?

