विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर घरी आला, बाचाबाचीत ‘पती, पत्नी और वो’ तिघांचा मृत्यू

रांची शहरातील मोहननगर येथील रहिवासी असलेले देव प्रसाद मेहेर यांची पत्नी कौशल्या देवी हिचे प्रकाश नावाच्या तरुणासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं बोललं जातं. मंगळवारी रात्री पती देव प्रसाद घरात असतानाच प्रकाशही आला. त्यावेळी देव प्रसाद आणि प्रकाश यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचा आरोप केला जात आहे

विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर घरी आला, बाचाबाचीत 'पती, पत्नी और वो' तिघांचा मृत्यू
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 12:14 PM

रांची : अनैतिक संबंधातून तिघा जणांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना झारखंडची राजधानी रांचीमध्ये घडली आहे. विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर घरी आला असताना झालेल्या बाचाबाचीत ‘पती, पत्नी आणि वो’ अशा तिघांचाही मृत्यू झाला. तर लहानगीच्या डोळ्याला चाकूमुळे गंभीर दुखापत झाली आहे.

काय आहे प्रकरण?

रांची शहरातील मोहननगर येथील रहिवासी असलेले देव प्रसाद मेहेर यांची पत्नी कौशल्या देवी हिचे प्रकाश नावाच्या तरुणासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचं बोललं जातं. मंगळवारी रात्री पती देव प्रसाद घरात असतानाच प्रकाशही आला. त्यावेळी देव प्रसाद आणि प्रकाश यांच्यात जोरदार बाचाबाची झाली, त्यात प्रियकर प्रकाश आणि कौशल्या या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मुलीच्या डोळ्यात चाकू लागला

गंभीर जखमी अवस्थेत पती देव प्रसाद आणि त्यांच्या मुलीला डकरा सीसीएल रुग्णालयात आणण्यात आले, जिथे देव प्रसाद यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलीच्या डोळ्यात चाकू लागला असून तिला पुढील उपचारांसाठी RIMS मध्ये पाठवण्यात आले आहे.

संपूर्ण घरात रक्ताचा सडा

हा प्रकार मंगळवारी रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी संपूर्ण घरात रक्ताचा सडा पडला होता. इन्स्पेक्टर फरीद आलम यांनी सांगितले की, स्थानिक लोकांकडे केलेल्या चौकशीत महिलेच्या अनैतिक संबंधांची माहिती समोर आली आहे. पोलिसांचा तपास सुरु असून इतक्यात काहीही बोलणे योग्य नाही.

हत्येचे नेमके कारण अस्पष्ट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाशची देव प्रसाद यांच्या पत्नीशी मैत्री होती. मंगळवारी देव प्रसाद घरात असतानाच प्रकाश देखील घरी पोहोचला, त्यानंतर प्रकरण आणखी चिघळले. मात्र हत्येचे नेमके कारण उघड झालेले नाही. डीएसपी अनिमेश नैथानी म्हणाले की, प्रथमदर्शनी हे प्रकरण अनैतिक संबंधांशी निगडीत असल्याचे दिसते. मात्र, तपास सुरू असून पोलिस लवकरच निष्कर्षापर्यंत पोहोचतील.

बेळगावात अनैतिक संबंधाच्या संशयातून चिमुकल्याची हत्या

दुसरीकडे, बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून नवऱ्याने चिमुकल्याचा जीव घेऊन बोअरवेलमध्ये फेकल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी बेळगावात उघडकीस आला होता. बोअरवेलमध्ये अडीच वर्षांचा चिमुकला मृतावस्थेत सापडल्याने बेळगावात एकच खळबळ उडाली होती. मात्र चिमुकल्याच्या आईच्या कुटुंबीयांच्या आरोपानंतर त्याचा पिताच या प्रकरणातील प्रमुख संशयित ठरला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत बापाने आपल्या चिमुकल्याची हत्या केल्याची कबुली दिली. बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील अलकनूर गावात हा प्रकार घडला होता. अडीच वर्षांचा चिमुकला  खेळताना बेपत्ता झाला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका बोअरवेलमध्ये तो मृतावस्थेत आढळला होता.

संबंधित बातम्या :

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीकडून पोटच्या मुलीची पाण्याच्या हौदात बुडवून हत्या

डोक्यात दगड घालून अल्पवयीन मुलीची हत्या , बाथरूम शेजारी मृतदेह आढळल्याने खळबळ

लग्नासाठी नकार दिल्याने बापाकडून मुलीची हत्या, मृतदेह अर्धवट जळल्याने पुन्हा दफन

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.