घरात एकटी असल्याची संधी साधून तरुणीवर अत्याचार, पोलिसांनी काही तासात आरोपीला ताब्यात घेतलं, मग…

कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना घडली आहे. ज्यावेळी मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात केला गुन्हा दाखल केला. त्यावेळी पोलिसांनी काही तासात आरोपीला ताब्यात घेतले.

घरात एकटी असल्याची संधी साधून तरुणीवर अत्याचार, पोलिसांनी काही तासात आरोपीला ताब्यात घेतलं, मग...
कल्याणमध्ये मंगळसूत्र चोरांचा सुळसुळाट
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 11, 2023 | 11:31 AM

कल्याण : कल्याणमध्ये (kalyan news) घरात एकटी असलेल्या तरुणीवरती शेजारच्या तरुणाने धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. ज्यावेळी हे सगळं प्रकरण तरुणीने तिच्या बहिणीच्या कानावर घातलं, त्यावेळी तरुणीच्या बहिणीने थेट पोलिस स्टेशन (kalyan police) गाठले. त्या तरुणाच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी (kalyan crime news in marathi) त्या तरुणाला काही तासांच्या आतमध्ये ताब्यात घेतलं. सागर गाडे असं त्या तरुणाचं नाव असून पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत. तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून त्याने संधी साधली आहे. त्याचबरोबर याची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

औषध उपचारानंतर तिची तब्येत सुधारत चालली होती

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर पीडित तरुणीही कल्याण पूर्वेत आपल्या बहिणीच्या कुटुंबासोबत राहते. तीन वर्षांपूर्वी या पीडीत तरुणीने दहावीच्या परीक्षेचं टेन्शन घेतल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. औषध उपचारानंतर तिची तब्येत सुधारत चालली होती. काही महिन्यांपूर्वी पीडितेची बहीण आजारी असल्याने ती गावाला गेली होती. बहिणीचे पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पीडित तरुणी घरी एकटीच असायची. ही संधी साधत शेजारी राहणाऱ्या सागर याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली.

त्यामुळे तिने याची वाच्यता कुठेच केली नाही

त्यानंतर सागरने तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने आरडाओरड केल्याने तो तेथून निघून गेला. मात्र त्यानंतर पुन्हा आरोपीने पीडितेला धमकावत तिच्या घरात घुसून तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडिता घाबरली होती. त्यामुळे तिने याची वाच्यता कुठेच केली नाही. मात्र नंतर आरोपी पीडित तरुणी घराबाहेर पडली, तर तिची भर रस्त्यात छेड काढत तिच्या सोबत अश्लील चाळे करू लागला. अखेर या तरुणीने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. यानंतर पीडितेच्या बहिणीने पीडीत तरुणीला घेऊन मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी नराधम सागर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.