AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

6,6,6,6,6,6..! राजस्थान रॉयल्सच्या शिबिरात रवींद्र जडेजाचा आक्रमक अंदाज, आयपीएलपूर्वी दिला इशारा

Ravindra Jadeja, IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेसाठी दहा संघांची तयारी सुरू झाली आहे. असं असताना राजस्थान रॉयल्स संघात रूजू होताच रवींद्र जडेजाने आक्रमक अंदाज दाखवला. यावेळी त्याने अजून खूप काही बाकी असल्याचं देखील सांगितलं.

6,6,6,6,6,6..! राजस्थान रॉयल्सच्या शिबिरात रवींद्र जडेजाचा आक्रमक अंदाज, आयपीएलपूर्वी दिला इशारा
6,6,6,6,6,6..! राजस्थान रॉयल्सच्या शिबिरात रवींद्र जडेजाचा आक्रमक अंदाज, आयपीएलपूर्वी दिला इशाराImage Credit source: Rajasthan Royals Twitter
| Updated on: Mar 12, 2026 | 5:41 PM
Share

IPL 2026, Rajasthan Royals: आयपीएल 2026 अर्थात 19व्या पर्वाचं पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक समोर आलं आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ उतरणार असून जेतेपदासाठी दोन महिने चुरस असणार आहे. या स्पर्धेसाठी राजस्थान रॉयल्स संघाने आपला ट्रेनिंग कॅम्प आधीपासूनच सुरू केला होता. आता रवींद्र जडेजा या सराव शिबिरात सहभागी झाला आहे. मागच्या पर्वात रवींद्र जडेजा चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. मात्र या पर्वापासून राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. कारण या स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांची अदलाबदल झाली होती.राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात रूजू झाल्यानंतर फ्रेंचायझीने रवींद्र जडेजाचं स्वागत केलं होतं. आता फ्रेंचायझीने त्याचा सरावातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात रवींद्र जडेजा षटकारांचा वर्षाव करताना दिसत आहे. रवींद्र जडेजाने मैदानातील प्रत्येक कोपऱ्या एका पाठोपाठ एक षटकार मारले.

रवींद्र जडेजाने या शिबिरातील सरावानंतर सांगितलं की, हे पहिलंच सराव शिबीर होतं आणि काही फटके मारून बरं वाटत आहे. यानंतर रवींद्र जडेजाने आयपीएलमधील इतर संघांना इशाराही दिला. रवींद्र जडेजाने सांगितलं की, अजून खूप सारे शॉट्स त्याच्या बॅटमधून येणं बाकी आहे. म्हणजेच या स्पर्धेत रवींद्र जडेजा प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडेल हे नक्की आहे. आयपीएल स्पर्धेत रवींद्र जडेजाने अनेकदा फिनिशरची भूमिका बजावली आहे. हातातून गेला सामनाही आपल्या फलंदाजीच्या जोरावर खेचून आणला आहे. त्यामुळेच महेंद्रसिंह धोनी त्याचा उल्लेख सर जडेजा असा करतो.

रवींद्र जडेजाच आयपीएल सुरूवात राजस्थान रॉयल्स संघाकडून झाली होती. पहिल्या पर्वात संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आता इतर संघात फिरून आल्यावर रवींद्र जडेजा पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स संघात रूजू झाला आहे. आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्स ट्रेड विंडोच्या माध्यमातून त्याला चेन्नई सुपर किंग्सकडून घेतलं. तसेच संजू सॅमसनला रिलीज केलं. आता या पर्वात कोणता संघ चांगली कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल