AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 मार्चपासून OPPO आणि OnePlus स्मार्टफोन होणार महाग, जाणून घ्या कोणत्या मॉडेल्सवर होईल याचा परिणाम

16 मार्चपासून ओप्पो आणि वनप्लस स्मार्टफोन महाग होणार आहेत. वाढत्या कंपोनेटच्या किमतींमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे आणि तो भारतासह सर्व बाजारपेठांना लागू होईल. किंमत वाढीचा सर्वात आधी कोणत्या मॉडेल्सवर परिणाम होईल ते जाणून घेऊयात.

16 मार्चपासून OPPO आणि OnePlus स्मार्टफोन होणार महाग, जाणून घ्या कोणत्या मॉडेल्सवर होईल याचा परिणाम
Image Credit source: Social media
| Edited By: | Updated on: Mar 12, 2026 | 5:44 PM
Share

जर तुम्ही 20 मार्च नंतर नवीन OPPO किंवा OnePlus फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. दोन्ही कंपन्यांनी जॉइंट स्टेटमेंट जारी करून घोषणा केली आहे की 16 मार्चपासून स्मार्टफोन अधिक महाग होतील. फोनच्या सततच्या पुरवठ्याच्या कमतरतेमुळे तसेच कंपोनेटच्या किमती वाढल्यामुळे भारतासह सर्व बाजारपेठांमध्ये हा किमतीतील बदल लागू होईल.

सुरुवातीत मोबाईल फोनच्या किमतीत वाढ होताच यांचा प्रामुख्याने OPPO च्या K Series आणि A Series लाइनअपमधील बजेट डिव्हाइसेसवर तसेच निवडक OnePlus स्मार्टफोनवर परिणाम होणार आहे. दरम्यान OPPO ची फ्लॅगशिप फाइंड सिरीज, रेनो सिरीज आणि OPPO पॅड लाइनअप त्यांच्या सध्याच्या किमतीत विकले जातील.

किंमती इतक्या वाढू शकतात

91 मोबाईल्सच्या अहवालानुसार दोन्ही कंपन्या त्यांच्या स्मार्टफोनच्या प्रत्यक्ष किमतीत वाढ करण्याबाबत सध्या मौन बाळगून आहेत. बाजारातील ट्रेंडनुसार ही वाढ सुमारे 15 ते 20 टक्के असू शकते. याचा अर्थ असा की 47 हजार 999 रुपयांच्या किमतीत लाँच झालेला वनप्लस 15आर आता 50 हजार रुपयांचा टप्पा ओलांडू शकतो, जो मागील मॉडेलपेक्षा सुमारे 6 टक्के जास्त आहे. अलिकडच्या लीकवरून असे दिसून आले आहे की फोनची सुरुवातीची किंमत 51 हजार 999 रुपये असू शकते.

OnePlus 15 आणि OnePlus Nord 5 सिरीजसह इतर विद्यमान स्मार्टफोनच्या किमतीही वाढण्याची अपेक्षा आहे. Oppo बद्दल बोलायचे झाले तर, Oppo K14x, K13 सिरीज, K12x, A6 सिरीज आणि A5 सिरीज या स्मार्टफोनच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. तुम्ही जर या कंपनीचे स्मार्टफोन घेण्याचा विचारात असाल तर ते उशिरा खरेदी करण्यापेक्षा आत्ताच खरेदी करणे चांगले.

केवळ OPPO आणि OnePlusच नाही तर इतर मोबाईल फोन उत्पादक कंपन्या देखील वाढत्या घटकांच्या किमतींशी झुंजत आहेत आणि अखेरीस हा भार ग्राहकांवर टाकू शकतात. सॅमसंग आणि रियलमीने भारतात त्यांच्या काही स्मार्टफोन्सच्या निवडक मॉडेल्सच्या किमती आधीच वाढवल्या आहेत, तर Vivo आणि iQOO लवकरच असेच करण्याची अपेक्षा आहे.

Follow Us
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर
भाजपला धक्का, महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक संसदेत नामंजूर.
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म
मी ॲक्सिस बँकेत... नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस स्पष्ट म.
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक
खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू, फॉरेन्सिक.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल
लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर राहुल गांधींचा सरकारला थेट सवाल, म्हणाल.
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर... आरोप.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी....
संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपी.....
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख
नाशिक IT प्रकरण, फरार निदा खान या ठिकाणी लपल्याचा दावा, जामीन अर्ज दाख.
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर
उन्हाचा तडाखा वाढला, अहिल्यानगरमध्ये तापमान 41 अंशावर.
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर...
नाशिक धर्मांतरण प्रकरणी अमित ठाकरे आक्रमक; म्हणाले, मी असतो तर....
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!
TV9 चॅम्पियनशिप सीझन 2 साठी काऊंटडाऊन सुरू!.