AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीला शेवटचं पाहण्यासाठी घालमेल, मालकाकडून सुट्टी देण्यास नकार, शेवटी नोकराने जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही

कोरोनाची लागण होऊन पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे सुट्टी न दिल्यामुळे शेवटी एका नोकराने घरातील सोने, चांदी आणि रोकड पळवल्याचा धक्कादायक प्रकार कांदिवलीमध्ये घडला आहे. (kandivali servant stolen rupees and gold)

पत्नीला शेवटचं पाहण्यासाठी घालमेल, मालकाकडून सुट्टी देण्यास नकार, शेवटी नोकराने जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही
KANDIVALI SERVANT
| Edited By: | Updated on: May 21, 2021 | 12:02 PM
Share

मुंबई : कोरोनाची लागण होऊन पत्नीचा मृत्यू होऊनही सुट्टी न दिल्यामुळे शेवटी एका नोकराने मालकाच्या घरातील सोने, चांदी आणि रोकड पळवली आहे. हा धक्कादायक प्रकार कांदिवलीमध्ये घडला. या नोकराने आपल्याच मालकाच्या घरातून तब्बल 7 लाख 50 हजारांचे सोने आणि 40 हजाराची रोकड लांबवली. घरमालकाने तक्रार केल्यानंतर आरोपी अनिल यादव आमि श्याम यादव याला पोलिसांनी थेट बिहारमधील दरभंगा येथून ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही आरोपी मूळचे बिहारमधील असून सध्या ते पोलीस कोठडीत आहे. (Kandivali servant stolen 8 lakh rupees gold arrested in Bihar)

आजारी असल्यामुळे नोकराला कामावर ठेवले

मिळालेल्या माहितीनुसार कांदिवलीच्या विश्व मिलन सोसायटीमध्ये नवीनचंद्र मिस्त्री नावाचे ज्येष्ठ नागरिक राहतात. ते गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्यांची दर्शनी नावाची मुलगी अंधेरी येथे काम करते. या मुलीने वडिलांची देखभाल करण्यासाठी श्याम सुंदर यादव नावाच्या व्यक्तीला कामावर ठेवले होते. पण श्याम सुंदरच्या भावाचे लग्न 15 एप्रिल रोजी निश्चित झाल्यानंतर श्याम सुंदर आपल्या गावी गेला. यावेळी नवीनचंद्र मिस्त्री यांची काळजी घेण्यासाठी श्याम सुंदरने स्वत:च्या जागवेर मित्र अनिल यादव याला कामावर ठेवले. या काळात अनिल यादवने मिस्त्री यांची पुरेपूर काळजी घेतली. मात्र, 13 दिवसानंतर आपल्या पत्नीचे कोरोनामुळे निधन झाल्याचे अनिल यादवला समजले.

पत्नीला शेवटचे पाहण्यासाठी परवानगी नााकरली

पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर तिला शेवटचे पाहण्यासाठी एकदा गावाकडे जाऊन येतो म्हणत यादवने आपले घरमालक मिस्त्री यांना परवानगी मागितली. मात्र,यावेळी आजारी असलेल्या नवीनचंद्र मिस्त्री यांनी यादवला घरी जाण्यास नकार दिला. शेवटी गावाकडे जाऊ न दिल्यामुळे यादवला आपल्या पत्नीला शेवटचे पाहता आले नाही.

सुट्टी न दिल्याचा मनात राग

मिस्त्री यांनी गावाकडे जाण्यास नकार दिल्यामुळे अनिल यादवच्या मनात चांगलाच राग होता. शेवटी याच रागातून अनिलने 28 एप्रिल रोजी स्वत:च्याच मालकाच्या घरी म्हणजेच मिस्त्री यांच्या चोरी केली. यावेळी मोठा मुद्देमाल घेऊन तो गावी पळून गेला. यानंतर मिस्त्री यांची मुलगी दर्शनी 1 मे रोजी आपल्या घरी आली. मात्र, यावेळी घरातील कपाट उघडे असून त्यातील सोने तसेच चांदीचे दागीने गायब असल्याचे दर्शनी यांना समजले. शेवची कपटाचे दरवाजे उघडे असल्यामुळे घरात चोरी झाल्याचे दर्शनी यांना समजले. घरात ठेवलले तब्बल 7 लाख 50 हजाराचे सोने-चांदीचे दागिने आणि 40 हजारांची रोकड अनिल यादवने लांबवली होती.

अनिल यादव, श्याम सुंदरला अटक

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर दर्शनी यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आपले सूत्र आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास केला. यामध्ये अनिल यादवने चोरी केल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून अनिल यादव आणि श्याम सुंदर या दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून 2 तोळे सोने आणि 3 लाखांची रोकड जप्त केली. सध्या श्याम आणि अनिल दोघेही पोलीस कोठडीत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO : बीडमध्ये राडा ! पोलीस स्टेशन परिसरातच दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी, महिलांनाही मारहाण

भाजप कार्यकर्त्यांचा कोविड हॉस्पिटलमध्ये राडा, व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली

63 वर्षीय डॉक्टर पतीची हत्या, 61 वर्षीय प्रोफेसर पत्नीला अटक

(Kandivali servant stolen 8 lakh rupees gold arrested in Bihar)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.