भाजप कार्यकर्त्यांचा कोविड हॉस्पिटलमध्ये राडा, व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तुंगा कोविड रुग्णालयात भाजप कार्यकर्त्यांनी राडा केला आहे. (bjp palghar boisar covid hospital)

भाजप कार्यकर्त्यांचा कोविड हॉस्पिटलमध्ये राडा, व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली
बोईसरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालय व्यवस्थापकाला मारहाण केली.

पालघर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात मोठा हाहा:कार माजला आहे. रोज हजारे नवे रुग्ण आढळत असल्यामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी आरोग्य कर्मचारी जीवाचं रान करतायत. मात्र, काही ठिकाणी त्यांच्याशी गैरव्यवहार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तुंगा कोविड रुग्णालयात भाजप कार्यकर्त्यांनी (BJP activist) राडा केला आहे. त्यांनी बिल कमी करण्याची मागणी करत रुग्णालयाच्या व्यवस्थापकाला मारहाण केली. या प्रकारानंतर मारहाणप्रकरणी प्रशांत संखे याला पोलिसांनी तब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. (BJP activist beaten Palghar Boisar Covid hospital manager police arrested one accused)

रुग्णालय व्यवस्थापकाला मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार भोईसरमधील तुंगा करोना रुग्णालयामध्ये एका कोरोना रुग्णावर उपचार सुरु होते. याच रुग्णाच्या उपचारासाठी बिल कमी करण्याची मागणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापक संतोष शेट्टी यांना मारहाणसुद्धा केली. बाचाबाची करत भाजप कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्या कानशिलातही लगावली. तसा आरोप रुग्णालय प्रशासनाकडून केला जातोय.

संगणक साहित्याची तोडफोड

यावेळी, बील कमी करण्याची मागणी करत भाजपचे कार्यकर्ते प्रशांत संखे तसेच त्यांच्या साथीदारांनी गदारोळ केला. त्यानंतर व्यवस्थापक संतोष शेट्टी यांना मारहाण केली. तसेच यावेळी रुग्णालयातील संगणक आणि इतर साहित्याची तोडफोडसुद्धा करण्यात आली. शेट्टी यांना मारहाण झाल्याची माहिती रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याने दिली आहे.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारून भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशांत संखे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी दिली.

इतर बातम्या :

ऑक्सिजन टँकर काळाबाजारावर अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन, गडकरींचा थेट विशाखापट्टनमला, पहा काय घडलं?

‘आम्हाला नवा भारत नको’, सोशल मीडियावर #NoMoreModi ट्रेंडिंगवर, वाढत्या कोरोनामुळे लोक भडकले

रात्री अचानक तब्येत बिघडली, कर्जाचा डोंगर उभा करुन आईला मृत्यूच्या दारातून वाचवलं, डोळ्यांमधून पाणी आणणारी कहाणी

(BJP activist beaten Palghar Boisar Covid hospital manager police arrested one accused)