AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार, महाबळेश्वर हादरलं

मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Mahabaleshwar Principal Rape on Girl Student)

मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार, महाबळेश्वर हादरलं
ही गोष्ट कोणाला समजली तर तुझे बॉक्सिंग करिअर खराब करेन, अशी धमकीही या प्रशिक्षकाने मुलीला दिली होती.
| Updated on: Mar 09, 2021 | 11:35 AM
Share

सातारा : शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Mahabaleshwar Principal Rape on Girl Student)

मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरमधील माखरिया नावाची हायस्कूल आहे. या हायस्कूलमध्ये एका शाळेच्या मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दिलीप ढेबे असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी दिलीप ढेबे हा या शाळेचा मुख्याध्यापक आहे.

नराधम मुख्याध्यापकाने शाळा बंद असल्याचा फायदा घेऊन शाळेत बलात्कार केल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे महाबळेश्वर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. यानंतर त्या आरोपीला नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

महाविकासआघाडीच्या काळात महिला अत्याचाराच्या प्रमाणात घट

गेल्या काही दिवसांपासून राज्यात बलात्कार आणि महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलं आहे. दरम्यान राज्यात सत्ता परिवर्तन होण्याआधी फडणवीस सरकारच्या काळात 2018 मध्ये महिला अत्याचाराचे 35501 गुन्हे नोंदवण्यात आले आहे. तर 2019 साली 37112 इतके गुन्हे नोंदवण्यात आले होते. मात्र महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर 2020 मध्ये महिला अत्याचाराच्या प्रमाणात 10 हजारांपेक्षा जास्त संख्येने घट झाली आहे.  महिला अत्याचाराच्या 26586 इतक्या गुन्ह्यांची झाली आहे. (Mahabaleshwar Principal Rape on Girl Student)

संबंधित बातम्या : 

फडणवीस सरकारच्या तुलनेत महाविकासआघाडीच्या काळात महिला अत्याचाराच्या प्रमाणात घट

आधी प्रेमविवाह, आठ वर्षांचा मुलगाही, तरीही भल्या पहाटे क्षुल्लक कारणावरुन पतीची निर्घृण हत्या

मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह, अहमदनगरमध्ये भाजप तालुकाध्यक्षाचा जावयावर हल्ला

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...