मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह, अहमदनगरमध्ये भाजप तालुकाध्यक्षाचा जावयावर हल्ला

नेवासा येथील बंटी ऊर्फ प्रशांत राजेंद्र वाघ आणि पाथर्डीतील माणिक खेडकर यांच्या मुलीचा एक मार्च रोजी आंतरजातीय विवाह झाला. (BJP Leader Ahmednagar attacks Son in law)

मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह, अहमदनगरमध्ये भाजप तालुकाध्यक्षाचा जावयावर हल्ला
अहमदनगरमध्ये भाजप तालुकाध्यक्षाचा जावयावर हल्ला
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 3:12 PM

शिर्डी : मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासऱ्याने जावयाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अहमदनगरमधील पाथर्डी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांचा समावेश आहे. या प्रकरणी दहा जणांविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारहाण करण्यासाठी सुपारी देऊन खेडकर यांनी काही गुन्हेगार सोबत आणल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी हत्यारांसह सात जणांना अटक केली, तर तिघे फरार आहेत. (BJP Leader in Ahmednagar attacks Son in law after Daughter’s Inter Cast Love Marriage)

आरोपी कोण कोण?

प्रेमविवाह केलेल्या प्रशांत उर्फ बंटी राजेंद्र वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरुन भाजपाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, हृषिकेश खेडकर, प्रदीप गायकवाड, बळीराम अर्जुन मिरगे, अमोल भीमराज कानोजे, शाहिद सय्यद, नारायण हरिभाऊ चव्हाण, तात्यासाहेब जगदाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. अटक केलेले आरोपी हे बीड जिल्ह्यातील शिरूर येथील आहेत. त्यांच्याकडून एक मोटार, एक पिस्तुल, एक एअरगन, चाकू, गुप्ती ही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, त्यांचा चुलत भाऊ आणि हृषिकेश खेडकर हे फरार आहेत.

काय आहे प्रकरण?

नेवासा येथील बंटी ऊर्फ प्रशांत राजेंद्र वाघ आणि पाथर्डीतील माणिक खेडकर यांच्या मुलीचा एक मार्च रोजी आंतरजातीय विवाह झाला. या विवाहाला मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. शनिवारी दुपारी नेवासे पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरील कडूगल्ली येथे प्रशांत वाघच्या घरासमोर तीन-चार चारचाकी वाहने आली. एका गाडीतून मुलीचे वडील माणिक खेडकर, भाऊ ऋषिकेश खेडकर आणि एक जण उतरला. दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रशांतवर हत्याराने वार केला. परंतु मध्ये मोटारसायकल असल्याने वार चुकला.

जावयाच्या आरड्या-ओरड्यानंतर आरोपी पसार

प्रशांत जिवाच्या आकांताने ओरडत घरात पळाला. यावेळी मुलीच्या भावाने त्याच्यावर पिस्तुल रोखले. इतर गाड्यातून आलेल्या व्यक्तीच्या हातात चाकू, रॉड, एअर गन होते. यावेळी याला मारा, सोडू नका, असे माणिकराव खेडकर ओरडून सांगत होते. प्रशांतच्या ओरडण्याने गल्लीतील लोक जमा झाले. हे पाहून आरोपी आपापल्या गाड्यांत बसून नेवासे फाट्याच्या दिशेने पळाले. प्रशांतने पोलिस स्टेशनला फोन करून माहिती दिली. पोलिसांनी तत्परता दाखवून भानस हिवरा रोडवर हॉटेल सावताजवळ आरोपींना पकडले.

पोलिसांनी तीन गाड्यांसह सात जणांना ताब्यात घेतले. परंतु माणिक कोंडिबा खेडकर, ऋषिकेश खेडकर आणि त्यांचा भाऊ हे वेगळ्या वाहनाने फरार झाले, अशी फिर्याद प्रशांत वाघ याने नेवासे पोलिसात दिली. दरम्यान, पोलिसांनी सध्या सात जणांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आर्म अॅक्ट दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विजय करे करत आहेत.

संबंधित बातम्या :

येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदाराला ईडीची अटक

दुसऱ्यांदाही मुलगी झाली, चिपळूणमध्ये निर्दयी आईने एका महिन्याच्या मुलीला पाण्यात बुडवले

(BJP Leader in Ahmednagar attacks Son in law after Daughter’s Inter Cast Love Marriage)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.