दुसऱ्यांदाही मुलगी झाली, चिपळूणमध्ये निर्दयी आईने एका महिन्याच्या मुलीला पाण्यात बुडवले

रत्नागिरीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका आईनेच आपल्या (Baby Girl Killed By Mother) नवजात एक महिन्याच्या बाळाचा जीव घेतला आहे.

  • लक्ष्मीकांत घोणसे-पाटील, टीव्ही 9 मराठी, रत्नागिरी
  • Published On - 7:35 AM, 7 Mar 2021
दुसऱ्यांदाही मुलगी झाली, चिपळूणमध्ये निर्दयी आईने एका महिन्याच्या मुलीला पाण्यात बुडवले
Baby killed By Mother

रत्नागिरी : रत्नागिरीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका आईनेच आपल्या (Baby Girl Killed By Mother) नवजात एक महिन्याच्या बाळाचा जीव घेतला आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे आबीट गावात ही धक्कादायक घटना घडली आहे (Ratnagiri Chiplun One Month Baby Girl Killed By Mother).

चिपळूण तालुक्यातील सावर्डे आबीट गावात एका आईनेच आपल्या एक महिन्याच्या मुलीचा जीव घेतला आहे. एका महिन्याच्या मुलीला पाण्याच्या बकेटमध्ये बुडवून या निर्दयी मातेने तिची हत्या केली. दुसऱ्यांदा सुद्धा मुलगी झाली या रागातून तिने या बाळाचा जीव घेतला. या घटनेची माहिती गावात पसरतान संपूर्ण गावाला हादरा बसला आहे.

शौर्या प्रवीण खापले असं या एक महिन्याच्या बाळाचं नाव होतं. तिच्या मृत्यूप्रकरणी सावर्डे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, चौकशी दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारे यांच्यासमोर आईने आपला गुन्हा कबूल केला.

“आपणच आपल्या एका महिन्याच्या मुलीला पाण्यात बुडवून तिचा जीव घेतला”, असा कबुली जबाब या आईने अधिकारी सचिन बारे यांच्यासमोर दिला. दुसऱ्यांदाही मुलगी झाली या रागातून तिने या बाळाचा जीव घेतल्याचं तिने सांगितलं.

सध्या या प्रकरणी निर्दयी मातेवर गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सावर्डे पोलीस करत आहेत. मात्र, या घटनेने गावच नाही तर संपूर्ण जिल्हा हादरला आहे (Ratnagiri Chiplun One Month Baby Girl Killed By Mother).

खाऊसाठी पाच रुपये मागितल्याने वडिलांकडून पोटच्या मुलीची हत्या

काही दिवसांपूर्वी खाऊसाठी पाच रुपये मागितल्याने वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात उघडकीस आला होता. येथे जन्मदात्याने 20 महिन्यांच्या मुलीचा दरवाजावर आपटून जीव घेतला होता. याप्रकरणी आरोपी पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

नेमकं काय घडलं?

28 वर्षीय विवेक उईके हा तरुण संध्याकाळी कामावरुन घरी परत आला. त्यावेळी त्याची पावणेदोन वर्षांची मुलगी वैष्णवी रडत होती. विवेकची पत्नी अर्थात चिमुकलीची आई वर्षा उईके हिने मुलीला खाऊ घेऊन देण्यासाठी पतीकडे पाच रुपये मागितले. त्यामुळे विवेकच्या संतापाचा पारा चढला. रागाच्या भरात त्याने मुलीला उचललं आणि घरातील दरवाजावर जोराने आपटलं.

नागपुरात वडिलांकडून चिमुकलीची हत्या

तर नागपुरात वडिलांनी चिमुकलीची ब्लेडने गळा चिरुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर समोर आला होता. पतीसोबत झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी पत्नी पोलिसांत गेली असताना वडिलांनी मुलीची हत्या केली. दोन वर्षांच्या चिमुकलीचा करुण अंत झाला. नागपुरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

Ratnagiri Chiplun One Month Baby Girl Killed By Mother

संबंधित बातम्या :

रडणाऱ्या चिमुकलीसाठी आईने पाच रुपये मागितले, बापाने दरवाजावर आपटल्याने मुलीचा मृत्यू

धक्कादायक! अनैतिक संबंधात आड येणाऱ्या मुलाचा खून, बापानेच काढला काटा