धक्कादायक! अनैतिक संबंधात आड येणाऱ्या मुलाचा खून, बापानेच काढला काटा

धक्कादायक! अनैतिक संबंधात आड येणाऱ्या मुलाचा खून, बापानेच काढला काटा

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jan 04, 2021 | 6:00 PM

नाशिक : जन्मदात्यांनीच पोटच्या लेकरांची हत्या केल्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. असाच एक भयंकर प्रकार नाशिकमध्ये उघड झाला आहे. अनैतिक संबंधात आड येत असल्याने बापाणेच पोटच्या मुलाचा खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपी पित्याला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. (father has murdered son because he is interfering with the immoral relationship)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या वैद्वनगर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. आज पहाटेच्या सुमारास वडिलांनीच पोटच्या पोराची गळा आवळून हत्या केली. निलेश माळवाड असं मयत मुलाचं नाव असून प्रभाकर माळवाड असं आरोपी पित्याचं नाव आहे. प्रभाकर यांचे बाहेर अनैतिक संबंध होते. पण हे मुलाला समजल्यानंतर तो नात्याच्या आड येत होता. म्हणून पित्याने पोटच्या पोराचाच काटा काढला.

स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळावरून निलेशचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अधिक माहितीनुसार, आरोपी वडील प्रभाकर माळवाडला मुंबई नाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलीस आरोपीच्या कुटुंबाची आणि शेजारच्यांशीही चौकशी करणार असून प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. (father has murdered son because he is interfering with the immoral relationship)

संबंधित बातम्या – 

माता न तू वैरिणी…आई आणि मुलगा नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघड

एक तर प्रेमविवाह, त्यात लग्नाच्या दिवशीच संशयास्पद मृत्यू, पतीही गेला, जळगावात काय घडलं?

(father has murdered son because he is interfering with the immoral relationship)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें