रडणाऱ्या चिमुकलीसाठी आईने पाच रुपये मागितले, बापाने दरवाजावर आपटल्याने मुलीचा मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात येणाऱ्या लोणारा गावात ही संतापजनक घटना घडली. (Gondia Father kills Daughter)

  • शाहिद पठाण, टीव्ही 9 मराठी, गोंदिया
  • Published On - 15:17 PM, 4 Feb 2021
रडणाऱ्या चिमुकलीसाठी आईने पाच रुपये मागितले, बापाने दरवाजावर आपटल्याने मुलीचा मृत्यू

गोंदिया : खाऊसाठी पाच रुपये मागितल्याने वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात उघडकीस आली आहे. जन्मदात्याने 20 महिन्यांच्या मुलीचा दरवाजावर आपटून जीव घेतला. आरोपी पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Gondia Father kills Daughter as mother asks money for food)

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात येणाऱ्या लोणारा गावात ही संतापजनक घटना घडली. 28 वर्षीय विवेक उईके हा तरुण मंगळवारी (दोन फेब्रुवारी) संध्याकाळी कामावरुन घरी परत आला. त्यावेळी त्याची पावणेदोन वर्षांची मुलगी वैष्णवी रडत होती.

मुलीच्या आईने खाऊसाठी पैसे मागितले

विवेकची पत्नी अर्थात चिमुकलीची आई वर्षा उईके हिने मुलीला खाऊ घेऊन देण्यासाठी पतीकडे पाच रुपये मागितले. त्यामुळे विवेकच्या संतापाचा पारा चढला. रागाच्या भरात त्याने मुलीला उचललं आणि घरातील दरवाजावर जोराने आपटलं.

आईची तक्रार, पित्याला अटक

वैष्णवीच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तिला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी वैष्णवीला मृत घोषित केलं. त्यानंतर आईने तिरोडा पोलीस स्थानकात पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी पिता विवेक उईके याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध मुलीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gondia Father kills Daughter)

विवाहबाह्य संबंधात अडसर ठरत असल्याने बापानेच पोटच्या मुलाची हत्या केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये समोर आला होता. प्रभाकर यांचे विवाहबाह्य संबंध होते. मुलाला याचा सुगावा लागल्यामुळे पित्याने त्याचा काटा काढल्याची माहिती आहे.

मद्यधुंद अवस्थेत मुलीवर कुऱ्हाडीने वार

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील मौदहा भागात गेल्या महिन्यात पित्याने कुऱ्हाडीने आपल्याच मुलीची हत्या केली होती. मिस्त्रीचं काम करणाऱ्या रमेश प्रजापतीने दारुच्या नशेत कुऱ्हाडीने हल्ला करत मुलगी अनिताची (वय 22) हत्या केली. त्यानंतर हातात बंदूक दाखवत परिसरात दहशतही माजवली होती.

संबंधित बातम्या :

धक्कादायक! अनैतिक संबंधात आड येणाऱ्या मुलाचा खून, बापानेच काढला काटा

बाप, लखनौमधून लेकी पाठोपाठ नागपुरात आला, सासरच्यांनी काटा काढला!

मद्यधुंद अवस्थेत मुलीवर कुऱ्हाडीने वार करत हत्या, बापाची पोलिसांसमोर कबुली

(Gondia Father kills Daughter as mother asks money for food)