बाप, लखनौमधून लेकी पाठोपाठ नागपुरात आला, सासरच्यांनी काटा काढला!

मुलगी आणि वडील यांचं नात पवित्र समजलं जातं. मात्र ज्या बापाने लेकीला जन्म दिला तोच तिच्यासोबत संबंध ठेवत असल्याने सासरच्यांनी त्याची हत्या केली (Father immoral relationship with daughter in Nagpur).

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 17:33 PM, 18 Jan 2021
बाप, लखनौमधून लेकी पाठोपाठ नागपुरात आला, सासरच्यांनी काटा काढला!

नागपूर : वडील आणि मुलीचं वेगळं भावनिक नातं असतं. या नात्यामध्ये प्रचंड प्रेम, माया, जिव्हाळा, काळजी असते. लग्न करुन मुलगी सासरला जाते तेव्हा आईपेक्षा वडील जास्त भावनिक होतात. मुलीच्या लग्नानंतर वडील कित्येक महिने तिच्या आठवणीने हळवे होतात. मात्र, याच नात्याला काळीमा फासणारी घटना नागपुरात घडली आहे. या विकृत आणि विचित्र घटनेबाबत आपण कधीच कल्पना करु शकत नाही. इतकी भयानक आणि लाजिरवाणी ही घटना आहे. नागपुरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे (Father immoral relationship with daughter in Nagpur).

मुलगी आणि वडील यांचं नात पवित्र समजलं जातं. मात्र ज्या बापाने लेकीला जन्म दिला तोच तिच्यासोबत संबंध ठेवत असल्याने सासरच्यांनी त्याची हत्या केली. या घटनेने नागपुरात चांगलीच खडबड उडाली आहे (Father immoral relationship with daughter in Nagpur).

मुळचे लखनऊचे असलेले मोती गोस्वामी (नाव बदलेलं) यांचं आपल्या पोटच्या मुलीसोबतच अनैतिक संबंध होते. त्यांच्या मुलीचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं. लग्नानंतर मुलगी तिच्या सासरी नागपूरला राहायला आली. त्यानंतर मोती गोस्वामी हे देखील नागपूरला राहायला आले. मुलीच्या लग्नानंतरही त्यांनी पोटच्या मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवायला सुरुवात केली.

संबंधित इसम मुलीचा वडील असल्याकारणाने सुरुवातीला मुलीच्या सासरच्यांना संशय आला नाही. मात्र, मुलगी आणि वडील एकदा आक्षेपार्ह स्थितीत दिसल्यानंतर घरच्यांचा संशय बळावला.

मुलीचा दिर आणि त्याचे मित्र मोती यांच्यावर पाळत ठेवून होते. चुकीच्या उद्देशाने मोती घरी आल्याचे कळताच मुलीच्या दिराने आपल्या मित्रांसोबत मिळून हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात मोती यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. याप्रकरणातील दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : धक्कादायक! मुंबईत नवजात बाळांची विक्री करणाऱ्यात डॉक्टर, नर्सही!