AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंताचं दुसरं लग्न, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासोबत का मोडला पहिला संसार? 8 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर…

'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने दुसरं लग्न केलं आहे. तर अभिनेत्रीचं पहिलं लग्न शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासोबत झालं होतं... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अपूर्वा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंताचं दुसरं लग्न, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यासोबत का मोडला पहिला संसार? 8 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर...
Apurva Nemlekar
| Updated on: Feb 16, 2026 | 10:27 AM
Share

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मालिकेत अपूर्वा हिने शेवंता या भूमिकेला न्याय दिलेला. चाहत्यांनी अभिनेत्रीच्या भूमिकेला डोक्यावर घेतलं. आता शेवंता कोणत्या भूमिकेमुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अपूर्वी हिने व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीच नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. अपूर्वा हिने लग्न केलं आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत अपूर्वी हिने चाहत्यांसोबत आनंद शेअर केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अपूर्वा हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लग्नाचे फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने मनातील भावना देखील व्यक्त केल्या आहेत. 14 फेब्रुवारी 2026 — एक अशी तारीख जी कायमची आमची झाली.. असं अपूर्वाने फोटो पोस्ट करत म्हटलं आहे.

लग्नाचे फोटो पोस्ट करत अपूर्वा म्हणते, माझ्या मनातील अपार कृतज्ञतेसह, मला हे सांगण्यास आनंद होत आहे की मी आता श्रीमती अपूर्वा तनुज गोवलकर आहे. आयुष्याने माझी अनेकदा परीक्षा घेतली आहे. मी खचले… पण प्रेमावर विश्वास ठेवणं कधीच थांबवलं नाही… आयुष्यात आलेल्या अनेक वादळांनंतर मला देवाने शांती दिली आहे… व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच माझ्या प्रेमाला त्याचे प्रेमाला घर सापडले… असं देखील अभिनेत्री म्हणाली….

सांगायचं झालं तर, अपूर्वा हिचं हे दुसरं लग्न आहे. अपूर्वा हिने पहिलं प्रेमविवाह केलेला. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अपूर्वा हिच्या पहिल्या पतीबद्दल सांगायचं झालं तर, 2024 मध्ये अपूर्वा आणि रोहन यांचं लग्न झालं. अपूर्वाच्या पहिल्या पतीचं नाव रोहन देशपांडे असं आहे. लग्नापूर्वी दोघे चांगले मित्र होते… मिळालेल्या माहितीनुसार, दोघे एकमेकांना 8 वर्षांपासून ओळखत होते. तब्बल 8 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. मुंबईत दोघांचं लग्न झालं. पण लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अपूर्वा हिचा पहिला पती रोहन देशपांडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघे राजकारणात सक्रिय आहेत. रोहन देशपांडे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. ते दादर याठिकाणी राहतात. तर शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमात रोहन उपस्थित असतात. रोहन हे सिनेसृष्टीतील देखील अनेक कलाकारांना ओळखतात.

Follow Us
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप