AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाने पतीचा मृत्यू, विरहातून पत्नीची 18 महिन्यांच्या मुलीसह आत्महत्या, पुण्याच्या शिक्षक दाम्पत्याचा करुण अंत

एक महिन्यांपूर्वी कोरोनाने शिक्षक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. पतीविरह सहन न झाल्याने शिक्षिका असलेल्या पत्नीने तिच्या 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे.

कोरोनाने पतीचा मृत्यू, विरहातून पत्नीची 18 महिन्यांच्या मुलीसह आत्महत्या, पुण्याच्या शिक्षक दाम्पत्याचा करुण अंत
बीडमध्ये पतीनिधनानंतर शिक्षक पत्नीची आत्महत्या
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 17, 2021 | 4:01 PM
Share

बीड : कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षक पतीचा विरह सहन न झाल्यामुळे शिक्षिका असलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन महिलेने आपलं आयुष्य संपवलं. बीडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

एक महिन्यांपूर्वी कोरोनाने शिक्षक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. पतीविरह सहन न झाल्याने शिक्षिका असलेल्या पत्नीने तिच्या 18 महिन्याच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बानेगाव इथे घडली आहे.

माहेरी येऊन लेकीसह आत्महत्या

शीतल राजाभाऊ जाधवर आणि शांभवी अशी मृत मायलेकींची नावं आहेत. राजाभाऊ आणि शीतल जाधवर हे दोघेही पती पत्नी पुणे येथे पेशाने शिक्षक होते. पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या शिक्षिका पत्नीने आपल्या मुलीसह माहेरी येऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याने बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

विरारमध्ये पतीनिधनानंतर पत्नीची आत्महत्या

पतीच्या निधनानंतर पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. 24 वर्षीय पतीचा आजारपणात मृत्यू झाल्यानंतर 22 वर्षीय पत्नीनेही आपलं आयुष्य संपवलं होतं. विरार पूर्वमधील मनवेलपाडा गावातील दादूस क्लासिक अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील 302 क्रमांकाच्या रुममध्ये ही घटना घडली होती. नरेंद्रसिंग परमार (वय 24 वर्ष) असं पतीचं नाव आहे, तर संतोषकुवर नरेंद्र सिंग परमार (वय 22 वर्ष) असे पत्नीचे नाव होतं.

मयत दाम्पत्य मूळ राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी होते. कामानिमित्त ते विरारमध्ये राहण्यासाठी आले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता, मात्र त्यांना मूलबाळ नव्हते. पती आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मध्यरात्रीच्या सुमारास पतीचा मृत्यू झाल्यानंतर घरात एकट्याच असणाऱ्या पत्नीनेही हॉलमध्येच फॅनला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. सकाळी त्यांचे नातेवाईक घरी गेल्यानंतर ही घटना उघड झाली होती.

वसईत पतीच्या प्रकृतीच्या धसक्याने पत्नीची आत्महत्या

दरम्यान, सर्व कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यात पतीची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे हतबल होऊन वसईत पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. वसईच्या मर्सेस गावात स्मिता डिसिल्वा (वय 35) या विवाहित महिलेने आत्महत्या केली होती.

नांदेडमध्येही मायलेकाची आत्महत्या

दुसरीकडे, कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडल्याचे काही महिन्यांपूर्वी समोर आले आहे. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान पतीची प्राणज्योत मालवल्याचं समजताच पत्नीने थेट तलाव गाठला. दोन मुलींना घरी ठेवून तिने धाकट्या मुलासह आयुष्य संपवलं.

संबंधित बातम्या :

कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या

कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात, पतीची प्रकृती चिंताजनक, धसक्याने वसईत विवाहितेची आत्महत्या

पती निधनानंतर 22 वर्षीय पत्नीची आत्महत्या, विरारमध्ये दाम्पत्याचा करुण अंत

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...