पती निधनानंतर 22 वर्षीय पत्नीची आत्महत्या, विरारमध्ये दाम्पत्याचा करुण अंत

विजय गायकवाड

| Edited By: |

Updated on: Aug 25, 2021 | 1:59 PM

पतीचा आजारपणात मृत्यू झाल्यानंतर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मयत दाम्पत्य मूळ राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी होते.

पती निधनानंतर 22 वर्षीय पत्नीची आत्महत्या, विरारमध्ये दाम्पत्याचा करुण अंत
पतीनिधनानंतर पत्नीची आत्महत्या

विरार : पतीच्या निधनानंतर पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये उघडकीस आली आहे. 24 वर्षीय पतीचा आजारपणात मृत्यू झाल्यानंतर 22 वर्षीय पत्नीनेही आपलं आयुष्य संपवलं.

विरार पूर्वमधील मनवेलपाडा गावातील दादूस क्लासिक अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील 302 क्रमांकाच्या रुममध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. नरेंद्रसिंग परमार (वय 24 वर्ष) असं पतीचं नाव आहे, तर संतोषकुवर नरेंद्र सिंग परमार (वय 22 वर्ष) असे पत्नीचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

मयत दाम्पत्य मूळ राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी होते. कामानिमित्त ते विरारमध्ये राहण्यासाठी आले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता, मात्र त्यांना मूलबाळ नव्हते.

पती आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मध्यरात्रीच्या सुमारास पतीचा मृत्यू झाल्यानंतर घरात एकट्याच असणाऱ्या पत्नीनेही हॉलमध्येच फॅनला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. सकाळी त्यांचे नातेवाईक घरी गेल्यानंतर ही घटना उघड झाली आहे. विरार पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवले असून अधिक तपासाला सुरुवात केली आहे.

वसईत पतीच्या प्रकृतीच्या धसक्याने पत्नीची आत्महत्या

दरम्यान, सर्व कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात सापडले. त्यात पतीची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे हतबल होऊन वसईत पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. वसईच्या मर्सेस गावात स्मिता डिसिल्वा (वय 35) या विवाहित महिलेने आत्महत्या केली होती.

नांदेडमध्येही मायलेकाची आत्महत्या

दुसरीकडे, कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडल्याचे काही महिन्यांपूर्वी समोर आले आहे. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान पतीची प्राणज्योत मालवल्याचं समजताच पत्नीने थेट तलाव गाठला. दोन मुलींना घरी ठेवून तिने धाकट्या मुलासह आयुष्य संपवलं.

संबंधित बातम्या :

कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या

कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात, पतीची प्रकृती चिंताजनक, धसक्याने वसईत विवाहितेची आत्महत्या

आधी प्रेमविवाह, आठ वर्षांचा मुलगाही, तरीही भल्या पहाटे क्षुल्लक कारणावरुन पतीची निर्घृण हत्या

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI