बारा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, ट्यूशन चालकाला बेड्या

बारा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, ट्यूशन चालकाला बेड्या
आरोपी ट्यूशन चालक
Image Credit source: टीव्ही9

सतीश नरंगळे असं आरोपीचं नाव आहे. तो नांदेडमधील काबरानगर भागात खासगी शिकवणी वर्ग चालवतो. पीडित मुलगी ही आरोपी नरंगळे याच्याकडे खासगी शिकवणीसाठी जात असे.

राजीव गिरी

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 08, 2022 | 3:05 PM

नांदेड : नांदेडमध्ये बारा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खासगी ट्यूशन क्लास चालवणाऱ्या शिक्षकाला (Teacher Arrested) पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. सतीश नरंगळे असं आरोपीचं नाव आहे. तो नांदेडमधील (Nanded Crime) काबरानगर भागात खासगी शिकवणी वर्ग चालवतो. पीडित मुलगी ही आरोपी नरंगळे याच्याकडे खासगी शिकवणीसाठी जात असे. यावेळी आरोपी शिक्षकाने अश्लील स्वरुपाचे चाळे केल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीच्या आईने दिली आहे. त्यानुसार भाग्यनगर पोलिसांनी पॉस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. महिला दिनालाच (Women’s Day) हा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त केला जात असून शिक्षक विद्यार्थिनीच्या पवित्रा नात्याला काळिमा फासला गेल्याचं बोललं जात आहे.

काय आहे प्रकरण?

नांदेडमध्ये बारा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या खासगी ट्यूशन क्लास चालवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन भाग्यनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

सतीश नरंगळे असं आरोपीचं नाव आहे. तो नांदेडमधील काबरानगर भागात खासगी शिकवणी वर्ग चालवतो. पीडित मुलगी ही आरोपी नरंगळे याच्याकडे खासगी शिकवणीसाठी जात असे.

शिक्षकाचे अश्लील चाळे, पीडितेच्या आईची तक्रार

आरोपी शिक्षकाने अश्लील स्वरुपाचे चाळे केल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीच्या आईने दिली आहे. त्यानुसार भाग्यनगर पोलिसांनी पॉस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

महिला दिनालाच हा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त केला जात असून शिक्षक विद्यार्थिनीच्या पवित्रा नात्याला काळिमा फासला गेल्याचं बोललं जात आहे.

 

संबंधित बातम्या :

नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

परदेशी महिलेचा ट्रेनमध्ये विनयभंग, सोशल मीडियावर तीन वर्षांचा शोध, आरोपी जवान कल्याणमध्ये जेरबंद

महिलेसोबत अश्लील संभाषण प्रकरणी अटक, फीट आल्याने न्यायालयीन कोठडीतील आरोपीचा मृत्यू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें