AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलेसोबत अश्लील संभाषण प्रकरणी अटक, फीट आल्याने न्यायालयीन कोठडीतील आरोपीचा मृत्यू

दत्तात्रेय वारके या व्यक्तीविरोधात डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात 5 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. एका महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण केल्याचा त्याच्यावर आरोप होता.

महिलेसोबत अश्लील संभाषण प्रकरणी अटक, फीट आल्याने न्यायालयीन कोठडीतील आरोपीचा मृत्यू
डोंबिवलीत विनयभंगाच्या आरोपीचा कोठडीत मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: Anish Bendre | Updated on: Feb 28, 2022 | 1:15 PM
Share

डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात (Dombivli) मानपाडा पोलीस ठाण्यात एका आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आरोपीला फिट आल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दत्तात्रेय वारके असं या आरोपीच नावं आहे. एका महिलेसोबत अश्लील संभाषण केल्या प्रकरणी (Molestation) दत्तात्रेय वारके याला अटक करण्यात आली होती. तो न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) मानपाडा पोलीस ठाण्याच्या आयसोलेशन रुममध्ये होता. मात्र सोमवारी पहाटे त्याला फीट आल्याने तो बेशुद्ध पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान दत्तात्रेय याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

काय आहे प्रकरण?

दत्तात्रेय वारके या व्यक्तीविरोधात डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात 5 फेब्रुवारी रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. एका महिलेसोबत फोनवर अश्लील संभाषण केल्याचा त्याच्यावर आरोप होता. दत्तात्रेय हा एका बिल्डरकडे कामाला होता. 2013 साली त्यांनी घर विकत देण्यासाठी एका महिलेकडून पाच लाख रुपये घेतले, मात्र या महिलेला तो घर पण देत नव्हता आणि पैसे पण परत करत नव्हता. यासंदर्भात महिलेने वारंवार दत्तात्रयकडे तगादा लावला, मात्र दत्तात्रेय काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एके दिवशी फोनवर त्याने महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा दावा केला जातो.

आरोपीला जळगावातून अटक

याबाबत संबंधित महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या संदर्भात महिलेने मानव अधिकारासह इतर ठिकाणी सुद्धा तक्रारी दिल्या होत्या. मानपाडा पोलिस ठाण्यात दत्तात्रय विरोधात महिलेकडून करण्यात आलेल्या तक्रारीवर पोलिसांनी 26 फेब्रुवारीला जळगावहून त्याला अटक केली. कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले.

फीट आल्याने बेशुद्ध

आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आधी कोव्हिड रिपोर्ट बंधनकारक आहे. त्यासाठी मानपाडा पोलिसांनी दत्तात्रेय आला पोलीस स्टेशनच्या आयसोलेशन रूममध्ये ठेवले होते. त्याची कोव्हिड चाचणी केली होती. पोलिस रिपोर्टच्या प्रतीक्षेत होते, मात्र आज पहाटे त्याला फीट आल्याने तो बेशुद्ध पडला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान दत्तात्रेयाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दत्तात्रेय याचे कुटुंब भुसावळला राहते. दुर्दैवी बाब म्हणजे कालच त्याच्या भावाचाही अपघात झाला आहे. फीट आल्याने दत्तात्रेयचा मृत्यू झाल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे. त्याचा मृतदेह जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून डॉक्टरांच्या पॅनल खाली त्याचे शवविच्छेदन होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पोलीस ताब्यात असलेल्या एका आरोपीचा मृत्यू झाल्याने डोंबिवलीत एकच खळबळ माजली आहे.

संबंधित बातम्या :

इक्वेडोरच्या तुरुंगात रक्तरंजित खेळ; कैद्यांचा एकमेकांवर बंदुक आणि स्फोटकांनी हल्ला, 68 ठार

बलात्काराच्या आरोपातील 25 वर्षीय आरोपी पळाला, वैद्यकीय तपासणीवेळी हातावर तुरी

एकाने फिट आल्याचं नाटक केलं, गंभीर गुन्ह्यातील चौघे आरोपी माढा सबजेलमधून पळाले

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट