बलात्काराच्या आरोपातील 25 वर्षीय आरोपी पळाला, वैद्यकीय तपासणीवेळी हातावर तुरी

औंध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकलसाठी आणले असताना पोलिसांची नजर चुकवून आरोपीने पलायन केले. खटाव तालुक्यातील औंध परिसरात पोलिसांची शोध मोहीम सुरु आहे.

बलात्काराच्या आरोपातील 25 वर्षीय आरोपी पळाला, वैद्यकीय तपासणीवेळी हातावर तुरी
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 9:05 AM

सातारा : पोलिसांच्या लॉकअपमधून आरोपी पळाल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेला 25 वर्षीय आरोपी कोठडीतून पळाला. सातारा जिल्ह्यातील औंध पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.

अनिकेत तुकाराम काळे (रा. कळंबी, तालुका खटाव) असे पळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अनिकेतला अटक केली होती.

वैद्यकीय तपासणीवेळी हातावर तुरी

औंध येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकलसाठी आणले असताना पोलिसांची नजर चुकवून आरोपीने पलायन केले. खटाव तालुक्यातील औंध परिसरात पोलिसांची शोध मोहीम सुरु आहे.

सोलापुरातील माढा सबजेलमधून चौघांचे पलायन

दरम्यान, सोलापुरातील माढा सबजेलमधून गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी पलायन केल्याचा प्रकार जुलै महिन्यात समोर आला होता. पलायन केलेले चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत होते. एकाने फिट आल्याचं नाटक केल्यानंतर तुरुंगाचं दार उघडताच चौघांनी पोबारा केला होता.

बनावट चलनी नोटा प्रकरणात आरोपी सिद्धेश्वर केचे कोठडीत होता, तर आरोपी अकबर पवार हा बेकायदेशीर हत्यार बाळगल्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होता. याशिवाय खुनाचा आरोप असलेला आकाश उर्फ रॉकी भालेकर, पॉक्सो कायद्या अंतर्गत आरोपी तानाजी लोकरे यांनी पलायन केले.

नेमकं काय घडलं?

कैदी अकबर पवार याने फिट आल्याचे नाटक केले. यापूर्वीही अकबरला दोन वेळा फिट आली होती. त्यामुळे बंदोबस्तावरील पोलिसांना फिट आल्याचे खरे वाटले. त्याला माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी जेलचा दरवाजा उघडल्यावर चौघांनी पलायन केले.

नागपुरातून पळालेला कैदी दिल्लीत

यापूर्वी, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेल्या कच्च्या कैद्याला गेल्या वर्षी दिल्ली येथून अटक करण्यात आली होती. खटला सुरु असलेला आणि न्यायलयीन कोठडीत असलेला सिजो चंद्रन हा कैदी पळून गेला होता. सिजो चंद्रनला 16 मे रोजी शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या टीबी वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र संधीचा गैरफायदा घेऊन तो पळून गेला होता.

बहिणीला खोटं सांगून मुक्काम

आरोपी दिल्ली येथील बहिणीकडे गेला असल्याची माहिती पोलिसांना समजली होती, तेव्हा अजनी पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क करुन आरोपी सिजो चंद्रन संदर्भात सूचना दिली. तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्याला त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केली. कोरोनाचा धोका वाढला असल्याने महाराष्ट्र शासनाने हजारो कैद्यांची मुक्तता केली आहे, मला देखील सोडून दिल्याची माहिती आरोपीने आपल्या बहिणीला दिली होती.

संबंधित बातम्या :

येरवडा कारागृहातून पाच कैद्यांचे पलायन, तात्पुरत्या जेलच्या खिडकीचे गज कापून पसार

कोरोनामुळे मलाही सोडलंय, नागपूर जेलमधून पळून गेलेला कैदी दिल्लीत बहिणीच्या घरी सापडला

सराईत गुन्हेगार जेलच्या कोव्हिड सेंटरचे गज कापून पळाले, ऊसाच्या शेतात दोन दिवस तळ, सापडले कसे?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.