AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nalasopara Molestation : नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

पीडित महिलेने या घटनेची तक्रार वसई जीआरपी पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी स्टेशनवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. महिला एस्केलेटरवरून वरच्या मजल्यावर जात असताना आरोपी महिलेचा विनयभंग करताना दिसला. त्यानंतर जेव्हा पीडित महिलेने त्याला चापट मारली तेव्हा आरोपीने महिलेलाही मारहाण केली आणि तेथून पळ काढला.

Nalasopara Molestation : नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 11:30 PM
Share

वसई : नालासोपारा स्टेशनच्या एस्केलेटरवर महिलेचा विनयभंग (Molestation) करणाऱ्या आरोपीला वसई रेल्वे (जीआरपी) पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शाहरुख बाबुनीसार खान (24) असे आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेला आरोपी सीसीटीव्ही (CCTV)मध्ये गुटखा खाताना दिसत होता. त्यानंतर जीआरपी (GRP) पोलिसांनी परिसरातील 50 हून अधिक पानवाल्यांमधून आरोपीचा शोध घेतला. आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली. विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेलाही आरोपीने मारहाण केली होती. जीआरपी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एक 25 वर्षीय महिला एस्केलेटरने जात होती. तेव्हा एस्केलेटरवरून 25 ते 30 वयोगटातील एक व्यक्ती तिच्या मागून आला आणि तिला मिठी मारली. यामुळे संतापलेल्या महिलेने त्याला चापट मारली. आरोपीने महिलेलाही मारहाण केली आणि तेथून पळ काढला. (Accused arrested for molesting woman in Nalasopara Railway Station)

महिलेने विरोध केल्यानंतर तिला मारहाणही केली

पीडित महिलेने या घटनेची तक्रार वसई जीआरपी पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी स्टेशनवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. महिला एस्केलेटरवरून वरच्या मजल्यावर जात असताना आरोपी महिलेचा विनयभंग करताना दिसला. त्यानंतर जेव्हा पीडित महिलेने त्याला चापट मारली तेव्हा आरोपीने महिलेलाही मारहाण केली आणि तेथून पळ काढला. महिलेने त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला, पण एस्केलेटर वरच्या दिशेने जात होता आणि जेव्हा आरोपी वरपासून खालपर्यंत धावत गेला तेव्हा महिलेला आरोपीचा पाठलाग करता आला नाही.

सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत अटक केली

महिलेच्या तक्रारीवरून, पोलिसांनी भादंवि कलम 354, 354(ए) आणि 323 नुसार गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला. ही घटना ज्या एस्केलेटरवर सीसीटीव्ही बसवण्यात आला होता त्या एस्केलेटरमध्ये आरोपी दिसत होता. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी स्टेशनवरून कुठून आला आणि कोणत्या मार्गाने गेला, यासाठी पोलिसांनी फलाटावर लावलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची छाननी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांना आरोपीचा फोटो मिळाला होता. मात्र आरोपीची ओळख पटल्यावरच आरोपीला अटक करता आली असती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर गुटखा खाताना दिसला. यानंतर आरोपीला पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकाने 50 हून अधिक पानवाल्यांच्या दुकानात जाऊन आरोपीचा फोटो दाखवून आरोपीबाबत विचारणा सुरू केली. दरम्यान, एका पानवाल्याने आरोपीचा फोटो ओळखला आणि सांगितले की, आरोपी मोबाईल शॉपीमध्ये काम करतो पण ते कोणते दुकान आहे हे त्याला माहीत नाही. त्यानंतर पोलिसांनी अनेक मोबाईल शॉपमध्ये जाऊन आरोपीचा शोध सुरू केला आणि त्याला अटक केली. (Accused arrested for molesting woman in Nalasopara Railway Station)

इतर बातम्या

Mobile Theft : कामानिमित्त आला आणि मोबाईल लंपास करून गेला, डोंबिवलीतील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

Vijay Mallya : न्यायालयीन आदेशाचा अवमान प्रकरण, विजय मल्ल्याविरोधातील सुनावणी लांबणीवर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.