Mumbai | धक्कादायक! परळ डेपोजवळ बेशुद्धावस्थेत आढळले, मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

| Updated on: Apr 09, 2022 | 9:16 AM

परळ एसटी डेपो जवळ बस कंडक्टर महेश बेशुद्धावस्थेत आढळले होते, त्यांना सायन रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाला. मयत महेश लोले यांचा एसटी आंदोलकांशी संबंध आहे की नाही हे स्पष्ट नाही.

Mumbai | धक्कादायक! परळ डेपोजवळ बेशुद्धावस्थेत आढळले, मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
मयत महेश लोले
Image Credit source: टीव्ही9
Follow us on

मुंबई : रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू (ST Conductor Death) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महेश लोले असं महाराष्ट्र परिवहन विभागातील मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते एसटी कंडक्टर म्हणून कार्यरत होते. मुंबईतील परळ एसटी डेपोच्या जवळ (Paral Bus Depot) ते बेशुद्धावस्थेत आढळले होते. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र सायन हाॅस्पिटलमध्ये लोले यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. लोले यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. एकीकडे मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) एसटी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे, मात्र लोले यांचा या आंदोलकांशी काही संबंध होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

नेमकं काय घडलं?

बेशुद्धावस्थेत सापडलेल्या एसटी कर्मचारी मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना मुंबईत समोर आली आहे. महेश लोले असं एसटीच्या मयत कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते एसटी कंडक्टर म्हणून कार्यरत होते.

मृत्यूचं कारण अस्पष्ट

महेश लोले मुंबईतील परळ एसटी डेपोच्या जवळ बेशुद्धावस्थेत आढळले होते. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु सायन हाॅस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. महेश लोले यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यांचा अपघात झाला, की उष्माघात किंवा तत्सम प्रकाराने त्यांचा बळी गेला, हे अजूनही निश्चित नाही.

मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक परिसरातील निवासस्थानाबाहेरही काही कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल चढवला होता. मात्र लोले यांचा या आंदोलनाशी काही संबंध आहे की नाही, हे अजूनही समजलेलं नाही.

संबंधित बातम्या :

स्कूटीस्वार चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबीय म्हणतात अपघात नाही, बाईकवाल्याच्या मारहाणीत जीव गेला

ह्रदयद्रावक ! मोहफुल वेचायला गेले अन् घामाघाम झाले, कालव्यात उतरले तर काका-पुतण्याला मृत्यूने गाठले

बाळंतपणात पोट फुगून इन्फेक्शन, नर्सच्या मृत्यूने बाळ पोरकं, नातेवाईकांचा डॉक्टरवर संताप