भयानक ! नराधमांनी अल्पवयीन मुलाच्या पोटात प्रायव्हेट पार्टद्वारे हवा भरली, आतडी फाटल्याने मुलाचा दुर्देवी मृत्यू

भयानक ! नराधमांनी अल्पवयीन मुलाच्या पोटात प्रायव्हेट पार्टद्वारे हवा भरली, आतडी फाटल्याने मुलाचा दुर्देवी मृत्यू

उत्तर प्रदेशच्या पीलीभीत येथे चार तरुणांनी प्रचंड घाणेरडं, किळसवाणं आणि विचित्र कृत्य केल्याने एका अल्पयीन मुलाला जीव गमवावा लगाला आहे (minor youth dies in UP pilibhit after filling air through compressors in private part).

चेतन पाटील

|

Mar 09, 2021 | 8:04 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या पीलीभीत येथे चार तरुणांनी प्रचंड घाणेरडं, किळसवाणं आणि विचित्र कृत्य केल्याने एका अल्पयीन मुलाला जीव गमवावा लगाला आहे. आरोपी चारही तरुण हे एका राईस मिलमध्ये कामाला होते. तर मृतक अल्पवयीन मुलगाही मिलमध्ये कामाला होता. या तरुणाच्या पोटात गावातीलच चार तरुणांनी कॉम्प्रेजर मशीनने प्रायव्हेट पार्टद्वारे पोटात हवा भरली. हवेच्या प्रेशरमुळे मृतक तरुणाचे आतडे फाटले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली नाही. त्यामुळे पोलिसांनी देखील याप्रकरणाची अद्यापही दखल घेतलेली नाही (minor youth dies in UP pilibhit after filling air through compressors in private part).

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशच्या पीलीभीत येथे काही नराधमांनी अल्पवयीन तरुणाच्या प्रायव्हेट पार्टद्वारे पोटात हवा भरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना पीलीभीतच्या पूरनपुर कोतलाली भागातील गुरुनानक राईस मिलमधील आहे. या मीलमध्ये नववी इयत्तेत शिकणारा अल्वयीन मुलगा काम करत होता. घराची परिस्थिती बिकट असल्याने तो आपल्या वडिलांच्या जागी मिलमध्ये काम करत होता. मात्र, त्याच्या याच गरिबीचा फायदा घेत मिलमध्ये काम करत असलेल्या त्याच्या गावातीलच चार तरुणांनी छळ करत त्याला मृत्यूच्या जबड्यात ढकललं.

मिलमध्ये दुपारच्या वेळी जेवणाची सुट्टी झाली. यावेळी गावाच्या चार तरुणांनी मृतक युवकाचे हातपाय धरले आणि कॉम्प्रेसर मशीनने त्याच्या प्रायव्हेट पार्टद्वारे पोटात हवा भरली. त्यानंतर मुलाची तब्येत प्रचंड बिघडली. तो कसाही करु लागला. त्याची परिस्थिती बघितल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं (minor youth dies in UP pilibhit after filling air through compressors in private part).

हवेच्या जास्त प्रेशरमुळे आतडी फाटली

मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. हवेच्या जास्त प्रेशरमुळे त्याची आतडी फाटल्याचं डॉक्टरांना कळालं. त्यानंतर युवकाला बरेलीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिथे उपचारादरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही

मृतक तरुणाची छेडछाड करणारे तरुण हे एकाच गावाचे असल्याने त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात कोणतीही तक्रार न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. विशेष म्हणजे या प्रकरणाची माहिती पोलिसांसह संपूर्ण जिल्ह्यात पोहोचली. मात्र, तरीही पोलीस अजून तक्रारीची वाट बघत आहेत.

हेही वाचा : या आईला सलाम! पोटचं लेकरु पोटाशी बांधून रिक्षाचालकाचं काम, छत्तीसगडच्या रणरागिणीची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें