Video : अंबरनाथमध्ये सोनसाखळी चोरांची दहशत! डॉक्टरनंतर विद्यार्थीनीला फटका, तोंड दाबून गळ्यातील चैन लुटली

| Updated on: Jun 08, 2022 | 7:25 AM

Ambarnath Chain Snatcher Video : धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथून शिवाजीनगर पोलीस स्टेशन हे अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे.

Video : अंबरनाथमध्ये सोनसाखळी चोरांची दहशत! डॉक्टरनंतर विद्यार्थीनीला फटका, तोंड दाबून गळ्यातील चैन लुटली
अंबरनाथमधील धक्कादायक घटना..
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये (Ambarnath News) एका विद्यार्थिनीची सोनसाखळी  (Chain Snatching) खेचून चोरटा पळून गेल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगरच्या रायगड बिल्डिंगसमोर ही घटना घडली. शिवाजीनगरच्या मधल्या आळीत राहणारी संस्कृती जाधव ही विद्यार्थिनी मंगळवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास तिच्या एका मैत्रिणीसोबत क्लासहून पायी घरी परतत होती. एक चोरटा रोटरी क्लबपासून संस्कृतीचा पाठलाग करत होता. शिवाजी नगरमध्ये नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या कार्यालयासमोरून जातानाही या विद्यार्थिनीच्या अगदी मागेमागे चालत असताना हा चोरटा सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेरात कैद झाला. यानंतर काही पावलं पुढे जाताच हा चोरटा तरुणीच्या पुढे गेला आणि तिचं तोंड दाबून तिच्या गळ्यातली सोनसाखळी ओढत पळून गेला. यावेळी संस्कृतीने आरडाओरडा केल्यानं दोन जण या चोरट्याच्या मागेही धावले, मात्र हा चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्यासह सुरक्षात्मक उपायोजना करण्याची मागणी नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केलीये.

धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथून शिवाजीनगर पोलीस स्टेशन हे अवघ्या 100 मीटर अंतरावर आहे. दोनच दिवसांपूर्वी कानसईत महिला डॉक्टरची सोनसाखळी खेचून नेल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर ही सलग दुसरी घटना असून त्यामुळं सोनसाखळी चोरांनी पोलिसांना थेट आव्हान दिल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तूर्तास यावर काहीही बोलायला नकार दिला आहे.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

अंबरनाथमध्ये नुकत्याच एका डॉक्टरलाही सोनसाखळी चोरांचा फटका बसला होता. दुचाकीवरुन येत रस्त्यावरुन जाणाऱ्या या डॉक्टर महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावण्यात आली होती. ही घटनाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा तशीच घटना समोर आली आहे.

पाहा डॉक्टर महिलेसोबत नेमकं काय घडलं होतं?

पोलिसांसमोर आव्हान

सोनसाखळी चोरीच्या घटना राज्यभरात डोकं वर काढत आहेत. अशात सोनसाखळी चोरांना आवरायचं कसं, हे आव्हान पोलिसांसमोर आहे.