Ola Cab Service : 62 रुपये ज्यादा घेतले म्हणून प्रवाशाला 15 हजारांची भरपाई; ओला कॅबला ग्राहक मंचाचा झटका

| Updated on: Feb 28, 2022 | 10:00 PM

अतिरिक्त शुल्क आकारणे ओला कॅबला चांगलेच महागात पडल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात ओला कॅबच्या चार्जिंग पॉलिसीबाबत गुन्हा दाखल करणार्‍या व्यक्तीला 15 हजारांची भरपाई मिळाली आहे. कंपनीला ही भरपाई केवळ 62 रुपये जादा आकारल्यामुळे द्यावी लागली.

Ola Cab Service : 62 रुपये ज्यादा घेतले म्हणून प्रवाशाला 15 हजारांची भरपाई; ओला कॅबला ग्राहक मंचाचा झटका
62 रुपये ज्यादा घेतले म्हणून प्रवाशाला 15 हजारांची भरपाई
Follow us on

मुंबई : मुंबईत रात्री-अपरात्री वेळेत घरी पोहोचण्यासाठी सुरक्षित प्रवास म्हणून ओला-उबेर (Ola-Uber) कॅब सेवेला पसंती दिली जाते. मात्र काही वेळेला ग्राहकांच्या विश्वासाला छेद दिला जातो आणि संधी मिळेल त्यानुसार ग्राहकाकडून अतिरिक्त पैसे घेतले जातात. अशा प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारणे ओला कॅबला चांगलेच महागात पडल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात ओला कॅबच्या चार्जिंग पॉलिसीबाबत गुन्हा दाखल करणार्‍या व्यक्तीला 15 हजारांची भरपाई मिळाली आहे. कंपनीला ही भरपाई (Compensation) केवळ 62 रुपये जादा आकारल्यामुळे द्यावी लागली. (Compensation to the passenger from Ola Cab for taking more money from the passenger)

प्रवास करणार्‍या वकिलाने ओला कॅबला कोर्टात खेचले होते

मुंबईमध्ये पेशाने वकील असलेल्या 34 वर्षीय श्रेयांस ममानिया यांनी गेल्या वर्षी 19 जून रोजी आपल्या कुटुंबासह कांदिवली ते काळाचौकी असा प्रवास केला होता. त्यांनी ओलाची कॅब बुक केली होती, तेव्हा अ‍ॅपने भाडे 372 रुपये इतके दाखवले होते. तथापि, जेव्हा ममानिया आणि त्यांचे कुटुंब गंतव्यस्थानी पोहोचले, तेव्हा कॅब चालकाने त्यांना 434 रुपये भाडे द्यावे लागेल, असे सांगितले. म्हणजेच अतिरिक्त 62 रुपये मागण्यात आले. ही मनमानी असल्याचा दावा करीत ममानिया यांनी कायदेशीर लढाईचा पर्याय निवडला होता.

कस्टमर केअरकडून कोणतीही मदत मिळाली नाही

ममानिया यांना ओला कॅबचे भाडे 62 रुपयांनी वाढल्याचे सांगण्यात आले. त्यावर त्यांनी ड्रायव्हरला विचारणा केली. त्यावर त्याने उत्तर दिले की अशा गोष्टी होतात, तुम्ही हा मोठा मुद्दा का बनवत आहात? चालकाच्या या उत्तरावर ममानिया संतप्त झाल्या आणि त्यांनी लगेच ओलाच्या कस्टमर केअरला फोन केला. मात्र त्यांना कस्टमर केअर सेंटरकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर चालकाने ममानिया यांना विनंती करणे सुरू केले. जर तुम्ही मला पूर्ण रक्कम दिली नाहीत तर माझ्याकडून शुल्क आकारले जाईल, असे त्याने ममानिया यांना सांगितले.

अतिरिक्त शुल्कवसुलीबाबत ग्राहक मंचाकडे केली तक्रार

वकिल ममानिया यांनी याबाबत ग्राहक मंचात तक्रार केली. ज्यानंतर त्याच्या केसची सुनावणी झाली तेव्हा ओला कॅबची चूक असल्याचे मानले गेले. त्याआधारे भरपाईही निश्चित करण्यात आली. अतिरिक्त 62 रुपये घेणे ओला कॅबला 15 हजारांचा फटका देऊन गेले. त्यामुळे ओला कॅबला मोठा झटका बसला आहे. (Compensation to the passenger from Ola Cab for taking more money from the passenger)

इतर बातम्या

Vasai Murder : वसईत मित्राकडून मैत्रिणीची हॉटेलमध्ये धारदार हत्याराने वार करुन हत्या

Bhandara Murder : चोरीचा डाव फसल्याचे लक्षात येताच चोरट्याने केले पती-पत्नीवर चाकूने वार, पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी