दहा दिवसांच्या मुलीचा अडीच लाखांना सौदा, नवी मुंबईत जन्मदात्रीसह पाच जणांना बेड्या

| Updated on: Dec 07, 2021 | 1:37 PM

नवी मुंबईतील उलवे सेक्टर 20 मध्ये एक महिला आपल्याच 10 दिवसांच्या मुलीला अडीच लाखांना विकणार असल्याचे पोलिसांना समजले होते. एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या टीमने सापळा रचला आणि मुलीच्या आईसह आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले.

दहा दिवसांच्या मुलीचा अडीच लाखांना सौदा, नवी मुंबईत जन्मदात्रीसह पाच जणांना बेड्या
नवजात बाळाचा सौदा करणारे पाच जण जेरबंद
Follow us on

नवी मुंबई : पोटच्या पोरीचा अडीच लाख रुपयांना सौदा करणाऱ्या जन्मदात्रीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील उलवे परिसरात खळबळ उडून देणारा हा प्रकार घडला आहे. वैरीण आईसह पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अवघ्या दहा दिवसांच्या मुलीची विक्री होत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. नवी मुंबईतील उलवे सेक्टर 20 मध्ये एक महिला आपल्याच 10 दिवसांच्या मुलीला अडीच लाखांना विकणार असल्याचे पोलिसांना समजले होते. एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या टीमने सापळा रचला आणि मुलीच्या आईसह आणखी चार आरोपींना ताब्यात घेतले.

दत्तक प्रक्रियेशिवाय अनधिकृत विक्री

या लोकांकडे चौकशी केली असता रितसर दत्तक घेण्याची कोणतीही प्रक्रिया आढळली नसल्याने नवजात बालकांची अनधिकृरीत्या विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी या आईसह आरोपींना अटक केली.

आरोपीकडून चार मोबाईल, पॅनकार्ड आणि पन्नास हजार रुपयाचे पाच बंडल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बालक आणि आईला भिवंडीच्या बाल कल्याण समितीकडे हजर करण्यात येणार असल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी यावेळी सांगितले.

नवजात अर्भकांच्या खरेदी-विक्रीचे रॅकेट

या कारवाईने नवजात बालकांची विक्री आणि खरेदी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नवी मुंबईत विविध रेल्वे स्टेशन बाहेर अशा नवजात बालकांची विक्री होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले असून आता अशा लोकांवर जोरदार कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारे नवजात बालकाची खरेदी विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

नवी मुंबई परिसरात संशयीत लोकांवर बिट मार्शल नजर ठेवून असणार आहेत. तसेच सोबत असलेल्या बाळाविषयी चौकशी करून संबंधित कागदपत्रे तपासणी करण्यात येईल. तसा काही गैरप्रकार आढळल्यास कारवाई करणारे असल्याचे परिमंडळ 1 उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

अहमदनगरात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलेची हत्या, मध्यरात्री दगड घालून संपवलं

कीर्ती आनंदाने बिलगली, मात्र भावाने डोकं उडवल्यावर आई छाटलेल्या मुंडक्यालाही शिव्या घालत राहिली

काळजाचे तुकडे करणारा अपघात; पालक चिमुकल्याला दुचाकीवर सोडून शॉपिंगला, तोल जावून रस्त्यावर पडला, अन्….