Video | स्पायडरमॅन सारखे भिंतीवर चढायचे, ग्रील कापायचे आणि घर लुटायचे! मालाड पोलिसांनी कसे शोधले चोर?

| Updated on: Feb 19, 2022 | 8:26 PM

Malad Theft : आरोपीने 21 तोळे दागिने हे सोनार मनोज जैनला दाखवले तेव्हा ते खोटे असल्याचं त्यानं सांगितलं. म्हणून त्याने ते जवळच असलेल्या ओशिवारा नाल्यात दागिन्यांनी भरलेला पाऊचच फेकून दिला.

Video | स्पायडरमॅन सारखे भिंतीवर चढायचे, ग्रील कापायचे आणि घर लुटायचे! मालाड पोलिसांनी कसे शोधले चोर?
मालाडमधील चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Follow us on

मुंबई : मुंबईतील मालाड पोलिसांनी चोरीप्रकरणी कारवाई करत दोघा सराईत (Two theft arrested by Malad police) चोरट्यांना अटक केली आहे. अब्दुल इंदिरस शेख आणि मनोज जैन असं चोरट्यांचं नाव आहेत. मालाडमध्ये या दोघांनीची घरांमध्ये चोऱ्या करुन लोकांची झोप उडवली होती. घरात स्पायडर मॅनसारखं (Spiderman) भिंतीवर चढून किंवा मग ग्रील कापून लोकांच्या घरात हे चोरटे शिरायचे. घरातील सोन्याचांदीचे दागिने चोऱ्या (Jewellery Theft) होण्याचं प्रमाण वाढलं होतं. याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीनं अखेर तपास करत चोरट्यांना गजाआड केलंय. यातील एक जण भिंतीवर चढून किंवा ग्रील कापून घरात घुसायचा आणि दागिने चोरायचा. तर अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीकडे चोरी केलेले दागदागिने विकले जात असल्याचं पोलिस तपासाच समोर आलं आहे.

अनेक दिवसांपासून पोलिस मागावर

43 वर्षांचा अब्दुल इंद्रिस शेख हा मालाडमध्ये चोऱ्या करत होत. लोकांच्या घरात घुसून दागिने पळवणाऱ्या अब्दुलच्या मागावर पोलिस अनेक दिवसांपासून होते. त्याचा शोध पोलिसांनी सुरु केला होता. आता मुख्य आरोपी अब्दुल शेखसोबतच ज्याला हे दागिने अब्दुल विकत होता, त्या 49 वर्षांच्या मनोज जैनलाही पोलिसांनी अटक केली आहे.

मालाड पोलीस ठाण्यात 7 फेब्रुवारीच्या दिवशी घरफोडीची तक्रार दाखल करण्यात आली होती. दोन घरातील 15 लाख रोख रक्कम आणि 21 तोळे दागिने घरफोडीत लंपास झाले होते. त्या अनुषंगाने मालाड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या दोन अधिकारी तपासाला सुरुवात केली. इतर पोलीस ठाण्यासह गोराई पोलीस ठाण्याचे पोलीस असे सर्व मिळून एकूण 16 जणांची टीम या चोरट्यांच्या मागावर होती. एक टीम आरोपी अब्दुल इंद्रिस शेक याला पकडण्यासाठी राजस्थान इथे विमानाने पोचली. राजस्थानमधून या आरोपीला अटक करून त्याचा साथीदार मनोज जैन याला देखील लगेचच पकडण्यात आलंय.

पाहा व्हिडीओ –

…चोरीचा डाव फसाल

विशेष म्हणजे आरोपीने 21 तोळे दागिने हे सोनार मनोज जैनला दाखवले तेव्हा ते खोटे असल्याचं त्यानं सांगितलं. म्हणून त्याने ते जवळच असलेल्या ओशिवारा नाल्यात दागिन्यांनी भरलेला पाऊचच फेकून दिला. पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपीने नाल्यात एक पाऊच फेकून दिला असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी ओशिवारा नाल्यात उतरून दागिन्यांनी भरलेला पाऊच शोधून काढला. त्या पाऊचमधून तब्बल 21 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केलेत.

पाहा सीसीटीव्हीत कैद झालेले चोरटे!

आरोपी अब्दुल इंद्रिस शेक याने या आधीही अशाच प्रकारचे अनेक गुन्हे केल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं आहे. ठाणे ग्रामीण, मीरा-भाईंदर अशा ठिकाणी देखील या आरोपीच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे आरोपी अब्दुल इंद्रिस शेख हा लोकांच्या घरात किंवा बिल्डिंगमध्ये स्पायडर मॅन सारखा घुसायचा. या दोघांकडून पोलिसांनी चांदीची नाणी, विविध प्रकारचे आणि वेगवेगळ्या कंपनीचे घड्याळ जप्त केलेत. अटक करण्यात आलेल्या दोघांचीही पोलिसांकडून आता कसून चौकशी सुरु आहे.

संबंधित बातम्या :

जिने ममतेने भरवला घास, नराधमाने तिचाच केला घात; मध्य प्रदेशात पैशासाठी वृद्ध महिलेची हत्या

रेल्वे प्रवाशांना दमदाटी करून लुबाडणारे तिघे गजाआड, सीसीटीव्हीच्या आधारे अटक, कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई

Dombivli Murder | अतिप्रसंगाला विरोध केल्याने विवाहितेची हत्या, सोफा सेट मर्डर केस सॉल्व्ह, केवळ चपलांवरुन आरोपी जाळ्यात