AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“साहिल खान मनसेच्या कार्यालयात आला नाही, तर…” मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी

अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो, असा आरोप मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आहे

साहिल खान मनसेच्या कार्यालयात आला नाही, तर... मनोज पाटील प्रकरणात मनसेची उडी
Mr India Manoj Patil, Sandeep Deshpande, Sahil Khan
Reporter Hemant Birje
Reporter Hemant Birje | Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 16, 2021 | 3:37 PM
Share

मुंबई : मिस्टर इंडिया मनोज पाटील (Mr India Manoj Patil) याला अभिनेता साहिल खान (Sahil Khan) याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. 20 सप्टेंबरला साहिल खान मनसेच्या कार्यालयात आला नाही, तर त्याला त्या पद्धतीचा इशारा देण्यात येईल, असं मनसेने म्हटलं आहे. बॉडी बिल्डर मनोज पाटील याला न्याय नक्की मिळेल, असा विश्वास मनोज पाटील याच्या मित्रांना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे सरचिटणीस अमेय खोपकर यांनी दिला.

काय आहे प्रकरण?

मिस्टर इंडिया मनोज पाटील (Mr India Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना 16 सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली. विषारी गोळ्या खाऊन 29 वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. बॉलिवूड अभिनेता साहिल खान (Sahil Khan) याच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

साहिल खानविरोधात याआधी मनोजने पोलिसांकडे तक्रार केलेलं पत्रही समोर आलं आहे. अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो, असा आरोप मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आहे.

कोण आहे मनोज पाटील?

मनोज पाटीलने 2016 मध्ये ‘मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ (Mr India Men’s Physique Overall Championship) हा किताब पटकावला होता. तो एक सुप्रसिद्ध मॉडेल, अॅथलीट आणि ट्रेनरही आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

मनोज पाटीलचे आरोप काय?

साहील खान नामक एक इन्फ्लुएन्सर आहे. तो काही दिवसांपासून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मला आणि माझ्या न्यूट्रिशन शॉपला टार्गेट करत आहे. त्यामुळे मला आणि माझ्या परिवाराला त्याचा खूप त्रास झाला आहे. मी एका मिडल क्लास फॅमिलीला बिलाँग करतो आणि माझ्या झालेल्या प्रगतीमुळे त्याला खूप जलस फील होत असल्यामुळे तो माझ्या आणि माझ्या शॉपबद्दल सोशल मीडियावर खूप काही बोलला आहे. त्याच्याद्वारे मला खूप धमक्या सुद्धा दिल्या गेल्या आहेत, की तुझं करिअर मी संपवून टाकेन. किंबहुना तो माझ्या बिल्डिंगखाली सुद्धा येऊन गेला. मला नाही माहित त्याच्यामागे त्याचा काय उद्देश होता.

हे सगळं चालू असताना आता तर तो माझ्या वाईफला घेऊन प्लॅन करतोय, की माझ्यावर माझ्या बायकोद्वारे काहीही अशी केस करुन मला अडकवायचं आणि मला कोर्ट कचेरीमध्ये ठेवून माझा यूएसएचा विजा कायमचा बरखास्त करायचा. कारण मला आता मिस्टर ऑलिम्पिया खेळण्यासाठी यूएसएला जायचंय. माझ्या आणि माझ्या वाईफमध्ये असलेल्या अनबनीचा फायदा घेऊन तिचा माईंड डायवर्ट करुन मला फसवून माझं करिअर कायमचं संपवायचं. आता हे सगळं पाहून मी आणि माझी फॅमिली खूप त्रस्त झालो आहोत. माझ्या घरी मी एकच कमवता मुलगा आहे आणि माझी आई हाऊसवाईफ आणि बाबा 65 वर्षांचे रिटायर्ड आहेत.

मला हा सगळा छळ पाहता आता खरंच सुसाईड करायला तो भाग पाडत आहे, असाच माझा छळ चालू राहिला तर येत्या काही दिवसात मी माझ्या जीवाचे काहीही बरेवाईट करुन घेणार आणि त्यानंतर या गोष्टीची पूर्ण जिम्मेदारी सरकार, पोलीस आणि साहिल खान याची असणार, असं मनोज पाटीलने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात आढळलं आहे.

कोण आहे साहिल खान?

साहिल खान एक बॉलिवूड चित्रपट अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि यूट्यूबर आहे. फिटनेस जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याने मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कार पटकावले आहेत.

संबंधित बातम्या :

‘स्टाईल’ चित्रपटातून मिळवली प्रसिद्धी, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहून ‘हे’ काम करतोय साहिल खान!

Manoj Patil | अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ