Khoya Khoya Chand | ‘स्टाईल’ चित्रपटातून मिळवली प्रसिद्धी, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहून ‘हे’ काम करतोय साहिल खान!

साहिलने त्याच्या एका म्युझिक व्हिडीओद्वारे त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली होती. या गाण्याचे नाव ‘नाचेंगे सारी सारी रात’ असे होते. त्याचे हे गाणे सुपरहिट ठरले आणि त्यानंतर साहिलने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

Khoya Khoya Chand | ‘स्टाईल’ चित्रपटातून मिळवली प्रसिद्धी, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहून ‘हे’ काम करतोय साहिल खान!
साहिल खान
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 9:02 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या पहिल्या चित्रपटापासून सर्वत्र प्रसिद्ध झाले होते. ते नेहमीच त्यांच्या खास शैली आणि लूकसाठी ओळखले जातात आणि मग चाहते देखील त्यांच्या लूकची कॉपी करू लागतात. आज आपण आपल्या ‘खोया खोया चांद’ या खास विभागात अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत. या अभिनेत्याला मनोरंजन विश्वात फार काळ टिकता आले नाही, परंतु तरीही सद्यघडीला देखील तो लाखो रुपये कमवत आहे. आपण ‘स्टाईल’ फेम अभिनेता साहिल खानबद्दल (Sahil khan) बोलत आहोत.

साहिलने त्याच्या एका म्युझिक व्हिडीओद्वारे त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली होती. या गाण्याचे नाव ‘नाचेंगे सारी सारी रात’ असे होते. त्याचे हे गाणे सुपरहिट ठरले आणि त्यानंतर साहिलने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. साहिलचा ‘स्टाईल’ या चित्रपटातील अभिनय आणि त्याचा लूक चांगलाच गाजला होता. साहिल अभिनित ‘स्टाईल’ या चित्रपटामध्ये शरमन जोशी मुख्य भूमिकेत दिसला होता. ‘स्टाईल’मधून शरमन जोशीची कारकीर्द बहरली, मात्र साहिल काही खास जादू दाखवू शकला नाही.

‘स्टाईल’नंतर साहिल ‘एक्सक्यूज मी’, ‘डबल क्लास’, ‘ये है जिंदगी’ अशा केवळ मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसला. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास दाखवू शकले नाहीत. दुर्बल कथेमुळे साहिलच्या बॉलिवूड कारकिर्दीचा आलेख हळूहळू खाली येऊ लागला.

प्रॉडक्शन हाऊसची सुरुवात

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी न मिळाल्यानंतर साहिलने स्वत:ची प्रोडक्शन कंपनी उघडली. या प्रॉडक्शन हाऊसच्या अंतर्गत गोविंदाचा ‘जिस देश मे गंगा रहता है’ आणि ‘बूम’सारखे चित्रपट बनले. पण हे प्रॉडक्शन हाऊस देखील फार काळ टिकू शकले नाही. साहिलवर फसवणूकीचा आरोप देखील लावण्यात आला होता, ज्यानंतर ते बंद करण्यात आले.

आता बॉडी बिल्डिंगमधून कमवतोय पैसे

बॉलिवूडपासून दूर असलेला साहिल आता बॉडी बिल्डिंगपासून लाखो रुपये कमवत आहेत. त्याने मसल्स अँड बीच नामक जिम चेन सुरू केली आहे. ज्याच्या माध्यमातून तो बक्कळ कमाई करत आहे. बॉलिवूडपासून दूर असलेला साहिल आता बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून लक्झरी आयुष्य जगत आहेत. तो सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फिटनेसचा सल्ला देखील देत राहतो. फिट बॉडीसाठी बरेच लोक साहिलला फॉलो करतात.

(Khoya Khoya Chand The fame gained from the movie Style now Sahil Khan is grow up as bodybuilder)

हेही वाचा :

Sonam Kapoor | वर्षभरानंतर भारतात परतली सोनम कपूर, वडिलांना पाहताच झाली भावूक, पाहा व्हिडीओ

‘Miss you Raji…’ पती राज कौशलच्या आठवणींनी व्याकूळ झाली मंदिरा बेदी, शेअर केली भावनिक पोस्ट

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.