AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : कायद्याचा धाक उरलाय का? धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग, धारदार शस्त्राचा धाकावर रिक्षा चालकाला धमकावले

Mumbai Crime News : मुंबईतील वांद्र्यात एका धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर येत आहे. सिग्नलवर रिक्षा थांबली असताना तरुण अचानक रिक्षात घुसला आणि त्याने दमदाटी केली.

Mumbai Crime : कायद्याचा धाक उरलाय का? धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग, धारदार शस्त्राचा धाकावर रिक्षा चालकाला धमकावले
धावत्या रिक्षात विनयभंग
| Updated on: Jul 23, 2025 | 9:21 AM
Share

S V Road Bandra : मुंबईतील वांद्र्यात धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सिग्नल लागल्याने चौकात रिक्षा थांबली. त्यावेळी अचानक तरुण रिक्षात घुसला. तरुणी आणि रिक्षा चालकाने त्याला खाली उतरण्याचे सांगताच त्याने शस्त्राचा धाक दाखवला. त्याने अश्लील शेरेबाजी केली. पुढील चौक येताच त्याने पोबारा केला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्याचे समोर येत आहे.

शस्त्राचा दाखवला धाक

भर दुपारी रिक्षात एका अनोळखी इसमाने रिक्षात शिरून १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना वांद्रे येथे घडली. रिक्षा सिग्नलला थांबली असताना आरोपी रिक्षात शिरला आणि चालकाला शस्त्राचा धाक दाखवून रिक्षा सुरू ठेवायला सांगितली. यानंतर त्याने धावत्या रिक्षात मागील आसनावर बसलेल्या महाविद्यालयीन तरूणीचा विनयभंग केला.

तरुणी या प्रकाराने भेदरली

पीडित तरुणी १६ वर्षांची असून वांद्रे येथे राहते. दररोज दुपारी ती रिक्षाने महाविद्यालयात जाते. सोमवारी दुपारी तिने नेहमीप्रमाणे एस. व्ही. रोड येथील बॉस्टन हॉटेलजवळून एक रिक्षा पकडली. दुपारी १२ च्या सुमारास रिक्षा सायबा हॉटेलजवळील सिग्नलवर थांबली , त्यावेळी रस्त्यावर गर्दी होती. काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक इसम अचानक रिक्षात शिरला.

रिक्षाचालक आणि त्या तरूणीने त्याला खाली उतरायला सांगितले. मात्र तो उतरायला तयार नव्हता , मला काही अंतरच पुढे जायचे आहे. दुसरी रिक्षा मिळत नाही असे सांगून तो जबरदस्तीने आत बसून राहिला. तरुणी आणि रिक्षाचालक त्याला उतरायला सांगत असतानाच सिग्नल सुटताच त्याने धारदार शस्रासारखी एक वस्तू काढली. रिक्षा थांबवायची नाही, अन्यथा मारून टाकेन अशी धमकी त्याने दिली. या प्रकारामुळे रिक्षाचालक आणि ती तरुणी दोघेही घाबरले. रिक्षा सुरू होताच त्याने अश्लील शेरेबाजी करीत तरुणीचा विनयभंग केला. पुढील सिग्नलवर रिक्षा थांबल्यावर तो उतरून पळून गेला. या प्रकारामुळे तरूणी प्रचंड घाबरली होती. ती महाविद्यालयात न जाता घरी परत आली. तिने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर पोलिसात धाव घेण्यात आली. आरोपीला अटक केल्याची माहिती समोर येत आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच