AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यूट्यूबवरून प्रशिक्षण घेत चोरी, दिंडोशी पोलिसांना टीप लागताच खेळ संपला; दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या थेट मुसक्या आवळल्या

मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी दुचाकी चोर टोळीतील 4 चोरट्यांना 7 चोरीच्या दुचाकींसह अटक केली आहे. ही टोळी मुंबई आणि परिसरातून महागड्या दुचाकी चोरायची. धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांनी यूट्यूबवरुन दुचाकी कशी चोरी करायची याचं प्रक्षिण घेतलं होतं.

यूट्यूबवरून प्रशिक्षण घेत चोरी, दिंडोशी पोलिसांना टीप लागताच खेळ संपला; दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या थेट मुसक्या आवळल्या
दुचाकी चोर
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Dec 29, 2021 | 6:45 AM
Share

मुंबई : मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी दुचाकी चोर टोळीतील 4 चोरट्यांना 7 चोरीच्या दुचाकींसह अटक केली आहे. ही टोळी मुंबई आणि परिसरातून महागड्या दुचाकी चोरायची. धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांनी यूट्यूबवरुन दुचाकी कशी चोरी करायची याचं प्रक्षिण घेतलं होतं. दिंडोशी पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आलं आहे. चोरट्यांनी स्पेलंडर, युनिकॉर्न, अ‌ॅक्टिव्हा या गाड्या चोरल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

चोरट्यांना कसं पकडलं?

दिंडोशीचे एपीआय चंद्रकांत घार्गे यांनी सांगितले की, दिंडोशी पोलिसांच्या शोध पथकाला चोरट्यांची टोळी वाहने चोरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर कुरार पोलीस ठाण्यातून तीन दुचाकी चोरांना प्रथम अटक करण्यात आली, त्यानंतर चौकशी केली असता त्यांच्याकडे वाहनं असल्याचे निष्पन्न झाले. नालासोपारा भागात चोरट्यांचा आणखी एक साथीदार राहत असल्याची माहिती मिळाली नंतर त्यालाही अटक करण्यात आली.

यूट्यूबवरून प्रशिक्षण घेऊन दुचाकी चोरी

दिंडोशी पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी पोलिसांना सांगितले की,गाड़ी कशी चोरायची, हे या लोकांना यूट्यूबवरून कळले होते. या टोळीतील चोरट्यांनी डीएन नगर पोलीस ठाणे, गोवंडी पोलीस ठाणे, सांताक्रूझ, जुई नगर आणि कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 7 वाहने चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले.

 वाहन चोरी कशासाठी

पोलिसांनी चार चोरट्यांना अटक करून 7 वाहने जप्त केली आहेत. ही टोळी लाँग ड्राईव्हला जाण्यासाठी,  स्वत:च्या वापरासाठी वाहने चोरायची. अनेकदा गाडी जायची तिथपर्यंत गाडी चालवायचे आणि जिथे गाडी थांबवायची तिथे सोडून जायचे, अशी माहिती दिंडोशी पोलीस स्टेशनचे एपीआय चंद्रकांत घार्गे यांनी दिली आहे.

अटक केलेल्या आरोपींची नाव

1.संदीप गायकवाड 2. गणेश चव्हाण उर्फ बूबा 3. योगेश सकरे 4.महेश स्वामी

सर्व आरोपी 20 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत, 10वी पर्यंत शिकलेले आहेत, कोणतेही काम करत नाहीत, सर्व आरोपी दारुच्या व्यसनाच्या आहारी गेले असल्याची माहिती देखील दिंडोशी पोलीस स्टेशनचे अधिकारी चंद्रकांत घार्गे यांनी दिली आहे.

इतर बातम्या:

Ahmednagar Crime: वीज पंप सुरू करण्याच्या वादातून तरुणाची हत्या; मृतदेह विहिरीत फेकला

Dombivali Crime : डोंबिवलीतील ‘त्या’ बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हातोडा, 40 कुटुंब बेघर

Mumbai Dindoshi Police arrested four two wheeler thefts with seven bikes

Follow Us
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू