मुंबईत पोलीस हवालदाराच्या मुलीचं टोकाचं पाऊल, फोनमधील ऑडिओ क्लिपमधून मोठा खुलासा

तरुणीने स्वत:चं आयुष्य संपवण्यापूर्वी मोबाईलमध्ये दोन ऑडिओ टेप रेकॉर्ड केल्या होत्या. यामध्ये तिने 26 वर्षीय तरुणाकडून छळ होत असल्याबद्दल म्हटलं होतं. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी 26 वर्षीय तरुणाविरुद्ध तरुणीला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत पोलीस हवालदाराच्या मुलीचं टोकाचं पाऊल, फोनमधील ऑडिओ क्लिपमधून मोठा खुलासा
भायखळा पोलीस ठाण्याचा प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 9:25 PM

मुंबईतील भायखळा परिसरात पोलीस हवालदाराच्या मुलीने नैराश्यात जावून टोकाचा निर्णय घेतला आहे. या तरुणीने आपल्या राहत्या घरात स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. तरुणी पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी होती. त्यामुळे तिने धैर्याने आपल्या अडचणींना सामोरं जाणं आवश्यक होतं. पण तिने आपल्याला होणाऱ्या त्रासाचा अतिविचार करुन स्वत:चं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या तरुणीने जीवन संपवण्याला एक 26 वर्षीय तरुण कारणीभूत असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडे आरोपी तरुणाच्या विरोधात तसा सक्षम पुरावादेखील सापडला आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणीने आपलं आयुष्य संपवण्यामागील कारणही धक्कादायक आहे. या पीडित तरुणीला एक 26 वर्षीय तरुण त्रास देत होता. त्याच्या छळाला कंटाळून पीडितेने राहत्या घरात आपलं आयुष्य संपवलं. संबंधित घटना समोर आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पीडितेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे मृत तरुणी ही पोलिसाची मुलगी असून आरोपीने तिला छळण्याचा प्रयत्न केलाच कसा? त्याची एवढी मोठी हिंमत झालीच कशी? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

पोलिसांनी तरुणीच्या मृत्यूमागचं गूढ उकल केलं?

तरुणीने स्वत:चं आयुष्य संपवण्यापूर्वी मोबाईलमध्ये दोन ऑडिओ टेप रेकॉर्ड केल्या होत्या. यामध्ये तिने 26 वर्षीय तरुणाकडून छळ होत असल्याबद्दल म्हटलं होतं. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी 26 वर्षीय तरुणाविरुद्ध तरुणीला जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यानंतर आरोपीला अटक देखील केली आहे.

या प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात सुरुवातीला एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मुलीच्या मृत्यूमागचे खरे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता, मृत्यूपूर्वी तिचे तिच्या दोन मित्रांशी बोलणे झाल्याचे निष्पन्न झाले. तो ऑडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता, ज्यामध्ये त्याने पराग डाकी (26) याला त्याच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. यानंतर भायखळा पोलिसांनी तात्काळ डाकीविरुद्ध भादंवि कलम 306 गुन्हा दाखल केला आहे.

Non Stop LIVE Update
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?
बारामतीनंतर शिरूरमध्ये तुतारीचा संभ्रम होणार? आयोगान कुणाला दिल चिन्ह?.
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.