मोठी बातमी ! गेल्या 4 वर्षापासून आर्यन खान घेतोय ड्रग्ज, शाहरुखच्या मन्नतची झडती होणार

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे.

मोठी बातमी ! गेल्या 4 वर्षापासून आर्यन खान घेतोय ड्रग्ज, शाहरुखच्या मन्नतची झडती होणार
मन्नत बंगल्याची झाडाझाडती होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 11:37 AM

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून त्याला आज जामीन मिळण्याची शक्यता आहे. NCB ने शाहरुख खानला आर्यनसोबत फोनवर बोलण्याची परवानगी दिली होती. चौकशीदरम्यान आणि वडिलांशी फोनवर बोलतानाही आर्यन सातत्याने रडत असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या 4 वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याची कबुली आर्यनने दिल्याची माहिती आहे.

शाहरुख-गौरीला लेकाच्या ड्रग्ज प्रकरणाची माहिती

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती. शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा मुलगा ड्रग्स घेत असल्याची माहिती असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यातही सर्च ऑपरेशन

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या ‘मन्नत’ या बंगल्यातही सर्च ऑपरेशनसाठीही टीम तयार आहे. आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याच्या लँडलाईन फोनवरुन शाहरुख खानशी सुमारे 2 मिनिटे बोलण्यास दिले. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान चौकशीदरम्यान सतत रडत होता. त्याने भारताबाहेर यूके ,दुबई आणि इतर देशांमध्ये ड्रग्सचे सेवन केले आहे.

‘मन्नत’ कुठे आहे?

शाहरुख खान आपली पत्नी गौरी आणि मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासोबत आपल्या सहा मजली मन्नत बंगल्यामध्ये राहतो. मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात समुद्रासमोरच प्राईम लोकेशनला हा बंगला आहे. काही महत्त्वाच्या दिवशी शाहरुखचे चाहते त्याच्या घराबाहेर त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमा होतात. ईद, दिवाळी किंवा होळीसारख्या सणांच्या दिवशीही शाहरुख बाल्कनीमध्ये येऊन आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देतो. हे पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. या बंगल्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार दोनशे कोटी रुपयांच्या घरात आहे.

‘मन्नत’वर छापेमारीची शक्यता का?

शाहरुखचा मुलगा आर्यनचा सर्वात जवळचा मित्र अरबाज मर्चंट कुठून ड्रग्ज आणायचा याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. या प्रकरणात अजूनही छापे टाकले जात आहेत आणि मोठ्या अटकेची अपेक्षा आहे. एनसीबीचे छापे दिल्लीत सुरु असून एक टीम गोमित चोप्राच्या घरीही पोहोचली आहे. NCB च्या सूत्रांनुसार अटक प्रक्रियेनंतर, NDPS कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक आरोपीच्या घरात शोध मोहीम घेण्याचीही तरतूद आहे, अशा परिस्थितीत NCB मुंबईत सुपरस्टार शाहरुख खानचे घर मन्नतमध्ये सर्च मोहीम राबवेल असे मानले जात आहे.

संबंधित बातम्या :

संजय दत्त ते रिया चक्रवर्ती आणि आता शाहरुखच्या पोराची केस लढणारे कोण आहेत सतीश मानशिंदे?

कोण आहे अरबाझ मर्चंट ज्याचं ड्रग्जकांडमध्येही नाव आणि शाहरुखची मुलगीही करते फॉलो?

शाहरुखच्या मानगुटीवर ते वानखेडे ते आताचे हे वानखेडे, का होतोय फोटो व्हायरल?

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.