उल्हासनगरात ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडत चोरी, चांदी, सोन्याचे दागिने लंपास, व्यापारी वर्गात खळबळ

| Updated on: Nov 23, 2021 | 12:30 PM

ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडत चोरी (Robbery At Jewellery Shop) झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) घडली आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडालीये. यात तीन ते चार किलो चांदी आणि काही सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. या चोरीच्या तपासासाठी पोलिसांची तीन पथकं तयार करण्यात आली आहे.

उल्हासनगरात ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडत चोरी, चांदी, सोन्याचे दागिने लंपास, व्यापारी वर्गात खळबळ
Ulhasnagar Robbery
Follow us on

उल्हासनगर : ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडत चोरी (Robbery At Jewellery Shop) झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) घडली आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडालीये. यात तीन ते चार किलो चांदी आणि काही सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. या चोरीच्या तपासासाठी पोलिसांची तीन पथकं तयार करण्यात आली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प 1 परिसरात शिवशक्ती ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. या ज्वेलर्सच्या मागच्या बाजूच्या भिंतीला भगदाड पाडत चोरट्यांनी दागिने चोरले आहेत. यात तीन ते चार किलो चांदी आणि काही सोन्याच्या दागिन्यांचा समावेश होता. या दुकानाचे मालक बाहेरगावी गेले असून हीच संधी साधत चोरट्यांनी दुकानात चोरी केली. त्यामुळे चोरट्यांनी दुकानावर पाळत ठेवून नियोजन करुन ही चोरी केल्याची शक्यता आहे. या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

या चोरीच्या घटनेनं पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान उभं राहिलंय. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी या चोरीच्या तपासासाठी तीन पथकं तयार केली असून चोरट्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. मात्र सध्या पोलिसांनी याबाबत काहीही बोलायला नकार दिलाय.

पुण्यात 13 दुचाकींसह वाहन चोर अटकेत

अचानक ओढवलेल्या कोरोनाच्या (Coroan) संकटाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. याकाळात अनेकांचे रोजगारही गेले. बेरोजगारीचा (Unemployment) वाईट परिणाम अनेकांच्या आयुष्यवर झालेला दिसून आला. असाच काहीसा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. लॉकडाऊनमध्ये रोजगार गेला. त्यानंतर प्रयत्न करूनही कुठेही रोजगार मिळाला नाही. मात्र कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तरुणानं चक्क दुचाकी चोरीला सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अख्तर चांद मुजावर, सातारा या वाहनचोराला अटक केल्यानंतर घटनेचा उलघडा झाला आहे. बंडगार्डन पोलिसांनी अख्तरला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 13 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

पिंपरीतील भुजबळ चौकातून 7 लाख किंमतीचा 30किलो गांजा जप्त ; दोघांना अटक

पोलीस भरती परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने नाशिकच्या तरुणाचा आयुष्याला पूर्णविराम