AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

35 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या, जखमी आरोपीचाही मृत्यू

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या समशेरपूरमध्ये 35 वर्षीय धम्मपाल आटोटेची हत्या करण्यात आली. तर हल्ला करताना जखमी झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

35 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या, जखमी आरोपीचाही मृत्यू
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 10:33 AM
Share

अकोला : 35 वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना अकोल्यात उघडकीस आली आहे. पोटात चाकू आणि कोयत्याने वार करुन धम्मपाल उर्फ आदेश महादेव आटोटे याची हत्या करण्यात आली. तर त्याच्यावर वार करताना जखमी झालेल्या आरोपीलाही प्राण गमवावे लागले. (Akola 35 years old man killed injured accused dies in hospital)

भाच्याच्या लग्नासाठी तरुण गावी

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या समशेरपूरमध्ये 35 वर्षीय धम्मपाल आटोटेची हत्या करण्यात आली. धम्मपाल हा सामाजिक कार्यकर्ता होता. तो औरंगाबाद येथे वास्तव्यास होता. मूर्तिजापूर येथील प्रतीक नगरमध्ये राहणारा 55 वर्षीय आरोपी दीपकराज डोंगरे हा 29 जूनपासून धम्मपालच्या मार्गावरच होता. धम्मपाल भाच्याच्या लग्नासाठी 29 जून रोजी आपल्या गावी आला होता.

घरात गाठून चाकू आणि कोयत्याने वार

दीपकराज डोंगरे याने 30 जून रोजी सकाळीच धम्मपालला समशेरपूरमधील घरीच गाठले. त्याच्या पोटात चाकू आणि कोयत्याने सपासप वार केले. यात धम्मपालचा घटनास्थळीच मृत्यू झाला. धम्मपालचा मोठा भाऊ त्याला वाचवण्यासाठी गेला असता आरोपीसोबत त्याचीही झटापट झाली. त्यात उजव्या हातावर चाकू लागल्याने भाऊही किरकोळ जखमी झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

गंभीर जखमी आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी दीपकराज डोंगरे हादेखील हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी अकोला इथे पाठवण्यात आले होते. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

सोशल मीडियावर मैत्री, नंतर प्रेमविवाह, आठ महिन्यांची मुलगी, तरीही जोडीदाराने पत्नीला का संपवलं?

आधी एका मामाच्या मुलीसोबत लग्न, नंतर दुसऱ्या मामाच्याही मुलीला पळवून आणलं, सासऱ्याने काटा काढला

(Akola 35 years old man killed injured accused dies in hospital)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.