आधी एका मामाच्या मुलीसोबत लग्न, नंतर दुसऱ्या मामाच्याही मुलीला पळवून आणलं, सासऱ्याने काटा काढला

आधी एका मामाच्या मुलीसोबत लग्न, नंतर दुसऱ्या मामाच्याही मुलीला पळवून आणलं, सासऱ्याने काटा काढला
आधी एका मामाच्या मुलीसोबत लग्न, नंतर दुसऱ्या मामाच्याही मुलीला पळवून आणलं, सासऱ्याने काटा काढला

खिलारवाडी येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. एका मामानेच त्याच्या भाच्याची हत्या केलीय (Man murder his nephew for having an immoral relationship with her daughter in sangli).

शंकर देवकुळे

| Edited By: चेतन पाटील

Jun 30, 2021 | 7:28 PM

सांगली : खिलारवाडी येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. एका मामानेच त्याच्या भाच्याची हत्या केलीय. या हत्येमागे भाच्याचे मामाच्या मुलीसोबत असलेले प्रेमसंबंध हे कारण होतं. विशेष म्हणजे मृतकाने आधी एका मामाच्या मुलीसोबत लग्न केलेलं होतं. तरीही त्याने दुसऱ्या मामाच्या मुलीला पळवून आणलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या दुसऱ्या मामाने आपल्या भाच्याला जीवे मारलं. या घटनेमुळे जत तालुका हादरला आहे (Man murder his nephew for having an immoral relationship with her daughter in sangli).

मृतक 22 जूनपासून बेपत्ता

मृतक तरुणाचं नाव नाना लोखंडे असं आहे. पोलिसांना त्याचा मृतदेह कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात सापडला होता. तो जत तालुक्यातील खिलरवाडी येथे वास्तव्यास होता. पण त्याचा मृतदेह कर्नाटकातील विजापुरात आढळला होता. तो 22 जूनपासून बेपत्ता होता. याप्रकरणी तो बेपत्ता असल्याची तक्रार जत पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारीनुसार पोलीस त्याचा शोध घेत होते (Man murder his nephew for having an immoral relationship with her daughter in sangli).

पोलिसांनी तपास कसा केला?

पोलिसांना कर्नाटकातील विजापुरात एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशी केली असता तो मृतदेह नाना लोखंडे याचाच असल्याचं समोर आलं. पोलिसांना एकंदरीत मृतदेहाची अवस्था बघता नाना याचा खून झाल्याचा संशय आला. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता त्याची वैयक्तिक माहिती समोर आली.

मामा-भाच्यात आधी कडाक्याचं भांडण

नाना लोखंडे याचे मामाच्या मुलीशी लग्न झाले होते. असे असताना त्याने दुसऱ्या मामाच्या मुलीला पळवून आणलं होतं. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यापूर्वी खिलारवाडी येथे पळवून आणलेल्या मुलीचा वडील म्हणजेच नानाचा मामा आणि त्याच्यात वाद झाला होता. दोघांमध्ये प्रचंड कडाक्याचं भांडण झालं होतं. याच कारणातून मामाने नाना लोखंडे याचा खून केला, अशी माहिती पोलिसांना तपासातून समोर आली.

आरोपींना अखेर अटक

पोलिसांनी आरोपी मामासह चार जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना कोर्टात हजर केलं असता सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जत पोलिसांनी मंगळवारी (29 जून) नाना लोखंडे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून त्याच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा : प्रेम केलं, पण पाच निरापराध कुटुबियांना जमिनीत गाडलं, गुंतागुंतीचं प्रकरण

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें