भंडाऱ्यात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, कॉलेजमधून घरी येऊन उचललं धक्कादायक पाऊल

| Updated on: Feb 02, 2022 | 9:12 AM

भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, लाखांदूर येथे बारावी वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

भंडाऱ्यात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या, कॉलेजमधून घरी येऊन उचललं धक्कादायक पाऊल
सांकेतिक छायाचित्र
Follow us on

तेजस मोहतुरे टीव्ही 9 मराठी, भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, लाखांदूर येथे बारावी वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.धीरज कसार (Dheeraj Kasar) या विद्यार्थ्यानं राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धीरज रमेश कसार वय 18 वर्ष असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. लाखांदूर तालुक्यातील परसोडी नाग (Parsodi Nag) येथील एका गरीब परिवारातील हुशार विद्यार्थी धीरज कसारं हा काल मंगळवार ला सकाळीच लाखांदूर येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात गेला होता. महाविद्यालयातून परत आल्यानंतर घरी कोणी नसल्याचं पाहून त्यानं आत्महत्या केली. धीरज कसारच्या आत्महत्येनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्याचं काम पोलिसांनी केलं. धीरज कसार यानं आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी केली हे अद्याप समोर आलेलं नाही.

आत्महत्येवळी घरात कोणीचं नव्हतं

महाविद्यालयातून आटोपल्यानंतर धीरज घरी आला तेव्हां घरी कुणीही नव्हते. धीरजची आई शेतीकामासाठी तर वडील जनावरे चारण्यासाठी गेले होते.घरी कुणीही नसल्याचे बघून धीरज ने आपल्या घरातील स्वयंपाक घरात स्वताला गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना रात्री उशिरा उघडकीस आली आहे.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

धीरज हा एकुलता एक मुलगा असून तो अतिशय हुशार असल्याची माहिती आहे. मात्र, त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचून घटनास्थळाचा पंचनामा केला. धीरजचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे. रमेश कसार यांचा एकुलता एक मुलगा असलेला धीरजच्या आत्महत्येचे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

इतर बातम्या:

 

 

Nagpur NMC | नदी काठावरील अतिक्रमणाविरुद्ध मोठी कारवाई; न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूरचे मनपा आयुक्त म्हणाले…

Pune Election : पुणे महापालिकेची प्रभागरचना जाहीर, सत्तेच्या चाव्या नव्यानं समाविष्ट 34 गावांच्या हाती जाणार?

Bhandara College Student of HSC Dheeraj Kasar commit suicide