AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहिता माहेरी, चारित्र्याच्या संशयातून पतीकडून हत्या

पती विलास याच्या त्रासामुळे मागील एक-दीड वर्षांपासून बक्षिता ही आपल्या दोन मुलांसोबत माहेरी नेहरु वार्डात राहायला आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी पती विलास हा बक्षिताकडे राहायला आला.

पतीच्या जाचाला कंटाळून विवाहिता माहेरी, चारित्र्याच्या संशयातून पतीकडून हत्या
भंडाऱ्या महिलेची गळा आवळून हत्या
| Edited By: Anish Bendre | Updated on: Dec 23, 2021 | 7:44 AM
Share

तेजस मोहतुरे, टीव्ही9 मराठी, भंडारा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीच्या संशयी स्वभावाला कंटाळून विवाहिता दीड वर्षांपासून माहेरी राहत होती. मात्र आरोपीने तिच्या घरी येऊन तिचा खून केल्याचा आरोप आहे. भंडारा जिल्ह्यात हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

भंडारा जिल्ह्यात मेंढा गावातील नेहरु वार्डात राहणाऱ्या बक्षिता हिचा विवाह पांढराबोडी येथील विलास मेश्राम याच्यासोबत झाला होता. लग्न झाल्यावर काही वर्षांनंतर विलास हा पत्नी बक्षीता हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते.

नवऱ्याच्या जाचामुळे विवाहिता माहेरी

पती विलास याच्या त्रासामुळे मागील एक-दीड वर्षांपासून बक्षिता ही आपल्या दोन मुलांसोबत माहेरी नेहरु वार्डात राहायला आली होती. मात्र काही दिवसांपूर्वी पती विलास हा बक्षिताकडे राहायला आला.

चारित्र्यावर संशय घेत गळा आवळला

त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरु झाली. यातच पती विलासने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली.

संबंधित बातम्या :

सांगलीत साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याची आईकडून हत्या; वाचा असे काय घडले की पोटच्या गोळ्यालाच संपवले

हरियाणात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, पत्नी-मुलासह पित्याने लावला गळफास, वाचा नेमके काय घडले?

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात