Pimpri Chinchwad crime| …..फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

तरुणीला विवस्त्र करता तिचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये किल्क केले. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घरी येत कुटुंबियाच्या सोबत पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली.

Pimpri Chinchwad crime| .....फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Dec 22, 2021 | 4:19 PM

पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात 19  तरुणीवर तिघांच्या सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पीडित तरुणीने सहकार नगर पोलिसस्थानकात तक्रार दिली आहे.

फोटो व्हायरल करण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश हा पीडित तरुणीचा चांगला मित्र आहेत, आरोपी प्रथमेशनं संधी साधत तिला आपल्या घरे बोलावले. जबरदस्ती करत तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याचवेळी आरोपीने तिचे नग्नावस्थेतील फोटोही काढले. यानंतर पुन्हा पीडित तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा पिंपरी चिंचवड येथील फ्लॅटवर बोलावलं. तिथे या आरोपी प्रथमेशने पुन्हा पीडितेवर बलात्कार केला. त्यावेळी त्याचे दोन मित्र स्वराज कदम व अन्य एका अनोळखी तरुण तिथे उपस्थित होते. त्यांनीही पीडित तरुणीवर बलात्कार केला. पुन्हा तरुणीला विवस्त्र करता तिचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये किल्क केले. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घरी येत कुटुंबियाच्या सोबत पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली.

गुन्हा पिंपरी चिंचवड आयुक्तालयाकडे वर्ग

पीडित मुलीने सहकारनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. मात्र बलात्काराची घटना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीचा मित्र प्रथमेश उर्फ सनी खैरे याच्यासह स्वराज कदम आणि अन्य एका अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रथमेश हा पीडित तरुणीचा चांगला मित्र आहे.

प्रेयसी आणि प्रियकराची गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न दुसरीकडे खेड तालुक्यात प्रेयसी आणि प्रियकराने झाडा गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला. तर प्रियकरावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की मृत सुषमा दिनकर सोनवणे (वय 22) व  हरिदास कुंडलिक देवचे (वय 28) यांचे प्रेम संबंध होते. घटनेच्या दिवशी दोघांमध्ये काही वाद झाला. यातून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृत सुषमा ही शिक्रापूर येथील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. तर हरिदास हा चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत खासगी नोकरीस आहे. या घटनेत जखमी हरिदासवर पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत खेड पोलीस अधिक तपास करत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही समोर आलेल नाही .

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें