Sangali Crime: माता न तू वैरिणी! सांगलीत साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याची आईकडून हत्या; वाचा असे काय घडले की पोटच्या गोळ्यालाच संपवले

प्राची वाजे असे आरोपी महिलेचे नाव असून अमरसिंह पाटील असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. आरोपी महिला वाळवा येथे आपला पती आणि मुलासोबत राहत होती. तिचे शिराळ तालुक्यातील बिळाशी येथील अमरसिंह पाटील याच्याशी प्रेमसंबंध जुळले.

Sangali Crime: माता न तू वैरिणी! सांगलीत साडेतीन वर्षाच्या चिमुरड्याची आईकडून हत्या; वाचा असे काय घडले की पोटच्या गोळ्यालाच संपवले
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 22, 2021 | 8:00 PM

सांगली : अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पोटच्या साडेतीन वर्षाच्या मुलाची आईनेच निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना सांगलीत घडली आहे. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रियकर आणि आईला अटक करण्यात केली आहे. महिलेने प्रियकरासोबत संगनमत करुन स्वतःच्या मुलाला निर्दयीपणे संपवले आहे.

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने मुलाचा शारिरीक छळ केला

प्राची वाजे असे आरोपी महिलेचे नाव असून अमरसिंह पाटील असे तिच्या प्रियकराचे नाव आहे. आरोपी महिला वाळवा येथे आपला पती आणि मुलासोबत राहत होती. तिचे शिराळ तालुक्यातील बिळाशी येथील अमरसिंह पाटील याच्याशी प्रेमसंबंध जुळले. याच प्रेमसंबंधातून महिला सहा महिन्यांपूर्वी 21 जून 2021 रोजी पती सुशांत वाजेला सोडून मुलाला घेऊन प्रियकरासोबत गायब झाली. दोघेही महिलेच्या मुलासह मुंबईत राहत होते. मात्र या अनैतिक संबंधात मुलगा अडथळा ठरत असल्याने प्राची आणि अमरसिंह यांनी त्याचा शारिरीक छळ केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सिनेस्टाईलने पुरावे नष्ट केले.

निनावी चिट्ठीच्या आधारे वडिलांनी पोलिसात खूनाचा दाखल केला

मुंबईमध्ये मुलाचा मृत्यू झाला असताना प्राची आणि अमरसिंह ह्या दोघांनी मिळून खेड तालुक्यातल्या बिळाशी या ठिकाणी सदर मुलाचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. वाकुर्डे याठिकाणी सदर मुलाचे अंत्यसंस्कार पार पाडत पुरावे नष्ट केले होते. मात्र मृत मुलाचे वडील सुशांत वाजे यांना आलेल्या एका निनावी चिठ्ठीने हा सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर वडील सुशांत वाजे यांनी आष्टा पोलीस ठाण्यात धाव घेत मुलाच्या खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी प्राची वाजे हिला मुंबईच्या साकी नाका येथून तर प्रियकर अमरसिंह पाटील याला आंबोली, सिंधुदुर्ग येथून अटक केल्याचे इस्लामपूर उपविभागीय अधीक्षक पुस्तकांत पिंगळे यांनी सांगितले. अमरसिंह पाटील शिराळा तालुक्यातल्या बिळाशी ग्रामपंचायतीचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. (The mother killed her son in an immoral relationship in Sangli)

इतर बातम्या

Pune crime | पुण्यातील कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’ ची 44 लाखांची फसवणूक

राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा ; नगरसेवक पद अबाधित

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें