मुंबईचा तरुण, भंडाऱ्याची तरुणी, लग्नाच्या आमिषाने नागपुरात बलात्कार

नागपूरच्या सीए रोड येथील एका हॉटेलमध्ये आरोपी पीडितेला घेऊन जायचा. मी तुझ्यासोबत लग्न करतो, असं सांगून तो पीडितेसोबत दुष्कर्म करत होता, मात्र लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होता.

मुंबईचा तरुण, भंडाऱ्याची तरुणी, लग्नाच्या आमिषाने नागपुरात बलात्कार

नागपूर : लग्नाचा आमिष दाखवून फेसबुक फ्रेंडवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. पीडिता ही भंडारा जिल्ह्याची आहे, तर आरोपी मुंबईचा रहिवासी आहे. नागपूरच्या हॉटेलमध्ये होणाऱ्या भेटीगाठींवेळी आरोपीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. गणेशपेठ पोलिसानी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याची घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत समोर आली आहे. आरोपीची पीडितेसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. पीडित महिला ही भंडारा येथे राहत होती, तर आरोपी समाधान पवार हा मुंबईला राहतो. त्यामुळे ते नागपुरात भेटत होते.

नेमकं काय घडलं?

नागपूरच्या सीए रोड येथील एका हॉटेलमध्ये आरोपी पीडितेला घेऊन जायचा. मी तुझ्यासोबत लग्न करतो, असं सांगून तो पीडितेसोबत दुष्कर्म करत होता, मात्र लग्न करण्यासाठी टाळाटाळ करत होता. यामुळे पीडितेने भंडारा आणि नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून गणेशपेठ पोलीस तपास करत आहेत.

सोशल मीडियावर झालेली ओळख आणि फेसबुक फ्रेण्डवर ठेवलेला विश्वास कितपत योग्य आहे, हे तपासणं गरजेचं आहे, अन्यथा असा घात होण्यास वेळ लागत नाही.

औरंगाबादच्या बँक अधिकाऱ्यावर मुंबईतील महिला पोलिसाचा आरोप

दरम्यान, लग्नाच्या आमिषाने आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप मुंबईतील महिला पोलीस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी केला होता. बँक अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीविरोधात पवई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कारासह धमकी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने एकूण तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मुंबईतही महिला पोलिसाचा अधिकाऱ्यावर आरोप

दुसरीकडे, लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याने पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.

संबंधित बातम्या :

लग्नाच्या आमिषाने महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, डोंगरीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा

नांदेडच्या पोलीस निरीक्षकाकडून बलात्कार, वाशिममधील महिला पोलीस शिपायाच्या आरोपाने खळबळ

लग्नाच्या आमिषाने मित्राच्या बहिणीवर सहा वर्ष बलात्कार, कॉन्स्टेबलला अटक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI