Video : ईsss! तुम्ही खात असलेली भाजी गटारात धुतलेली तर नाही ना? किळसवाणा व्हिडीओ समोर! भाजी विक्रेत्यावर गुन्हा

| Updated on: Jul 16, 2022 | 8:07 AM

Wardha Crime News : नालीत भाजी धुणारा भाजीविक्रेता हिंगणघाट शहराच्या डांगरी वार्डातील रहिवासी आहे.

Video : ईsss! तुम्ही खात असलेली भाजी गटारात धुतलेली तर नाही ना? किळसवाणा व्हिडीओ समोर! भाजी विक्रेत्यावर गुन्हा
धक्कादायक..
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

वर्धा : एक भाजी विक्रेता (Vegetable vendor) चक्क गटाराच्या घाण पाण्यात भाजी धुवत असल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात (Viral Video) कैद झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच संताप व्यक्त केला जात होता. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील हा प्रकार असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर याप्रकरणी आता भाजी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा भाजी विक्रेता चक्क सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच्या पाण्यात भाजी धुवत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. गुरुवारी याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तीव्र संताप भाजी विक्रेत्यांबाबत व्यक्त करण्यात येत होता. अखेर शुक्रवारी याप्रकरणी गंभीर दखल घेण्यात आली. हिंगणघाट (Wardha Crime News) नगरपालिकेचे प्रशासनक सतीश मासाळ यांनी पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित भाजी विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला. हिंगणघाट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन घेतला आहे.

काय दिसलं व्हिडीओमध्ये?

सदर भाजीविक्रेता हा हिंगणघाट शहराच्या मनसे चौकातील असलेल्या नालीतून आपली भाजी धूत असल्याच कॅमेऱ्यात एका नागरिकाने कैद करून सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल केले होते. नालीत भाजी धुणारा भाजीविक्रेता हिंगणघाट शहराच्या डांगरी वार्डातील रहिवासी असून शुभम टामटे असं त्याचं नाव आहे.

हे सुद्धा वाचा

हिंगणघाटमध्ये गुन्हा दाखल

सध्या पावसाच्या सरी सगळीकडे बरसत आहे. यामुळे विविध प्रकारचे आजार डोके सुद्धा वर काढत आहे. अशातच भाजी विक्रेत्याकडून नालीत भाजी धुवून विक्री करणे हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखं प्रकार आहे. या घटनेनंतर सर्व हात गाडीवर भाजी विक्री करणाऱ्यांवर संशयाच्या नजरेने पहिल्या जात होते. या प्रकाराची हिंगणघाट पोलिसात पालिकेने तक्रार देताच पोलिसांनी भादवीच्या कलम 273 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

काळजी घ्या

भाजीविक्रेत्याने केलेला हा प्रकार हिंगणघाट शहरातील एका सूज्ञ नागरिकांने कॅमेऱ्यात कैद करून उघडकीस आणला. भाजी विक्रेत्याच्या या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल केला.प्रशासनाने तात्काळ केलेल्या या कारवाईमुळे अश्या प्रकारावर अंकुश बसेल. दरम्यान, पावसाळ्यात शक्यतो पालेभाज्या खाऊ नये, असंही आवाहन जाणकार करतात.